रोममध्ये भारतीय दूतावासाच्या भिंतींवर लिहिलं ‘खलिस्तान जिंदाबाद’, अमेरिकेतही झेंडे फडकावले

| Updated on: Jan 27, 2021 | 10:51 AM

अमेरिका, वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) कृषी कायद्याला विरोध करताना खलिस्तान समर्थकांनी (Khalistan Supporters) भारतीय दूतावासाच्या (Indian embassy) बाहेर तर निदर्शनं तर केलीच पण त्यांनी खलिस्थानी झेंडेही यावेळी फडकवले.

रोममध्ये भारतीय दूतावासाच्या भिंतींवर लिहिलं खलिस्तान जिंदाबाद, अमेरिकेतही झेंडे फडकावले
Follow us on

नवी दिल्ली : कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers Protest) दिल्लीमध्ये हिंसक वळण लागलं. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियारवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. याच सगळ्यात खलिस्तानी स्वत: साठी जमीन शोधताना दिसून आले. अमेरिका, वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) कृषी कायद्याला विरोध करताना खलिस्तान समर्थकांनी (Khalistan Supporters) भारतीय दूतावासाच्या (Indian embassy) बाहेर तर निदर्शनं तर केलीच पण त्यांनी खलिस्थानी झेंडेही यावेळी फडकवले. (farmers protest in washington dc and rome khalistan supporters protest outside indian embassy)

कृषी कायद्यावरून देशात मोठ्या हिंसाचार उफाळला आहे. या मोर्चाच्या वेळी दिल्लीत वातावरण तापलं होतं. बॅरिकेट्स तोडण्यात आले. पोलिसांविरोधात तलवारी दाखवण्यात आल्या. इतकंच नाही तर लाल किल्ल्यावरही दरोडेखोरांनी धार्मिक ध्वजारोहण केलं. याचे परिणाम विदेशातही दिसून आले. अमेरिकेतील निदर्शनादरम्यान लोकांनी त्यांत्या हातात खलिस्तानाचा ध्वज फडकवला होता.

रोममध्येही प्रदर्शनं

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानी समर्थकांनीही इटलीतील रोममध्ये भारतीय दूतावासात निदर्शने केली. एशियानेट व्हीडिओनुसार, खलिस्तानी समर्थकांनी दूतावासाच्या भिंतींवरही घोषणा लिहिल्या. ‘खलिस्तान जिंदाबाद’ असं लिहून त्यांनी दूतावासात खलिस्तान झेंडा फडकावला.

आधाही केली होती प्रदर्शनं

परदेशी भारतीय दूतावासांच्या बाहेर खलिस्तानी समर्थक एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी अशी प्रदर्शन केली होती. खरंतर, अमेरिकेत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निदर्शकांनी दूतावासाबाहेर खलिस्तानी झेंडे फडकावले होते आणि गांधीजींचा पुतळा फोडला होता. (farmers protest in washington dc and rome khalistan supporters protest outside indian embassy)

संबंधित बातम्या – 

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

Fact Check : लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथं खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकावला का? वाचा सविस्तर

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

Fact Check: राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याच्या फोटोचं राष्ट्रपतींकडून अनावरण? वाचा वास्तव…

(farmers protest in washington dc and rome khalistan supporters protest outside indian embassy)