Fact Check: राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याच्या फोटोचं राष्ट्रपतींकडून अनावरण? वाचा वास्तव…

केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांची यंदाची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.

Fact Check: राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याच्या फोटोचं राष्ट्रपतींकडून अनावरण? वाचा वास्तव...
Subhash Chandra Bose And prosenjit Chatterjee photo controversy
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 7:41 AM

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांची यंदाची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका फोटोचे अनावरण करण्यात आले. याच फोटोवरुन सध्या वाद सुरु आहे की तो फोटो नेताजींचा होता की बंगाली अभिनेते प्रसेनजीत चॅटर्जी यांचा…? परंतु ‘अल्ट न्यूज’ने सत्य पडताळलं असतं व्हायरल फोटोमागचं सत्य समोर आलं आहे. (RaShtrapati Bhavan Clariffication on Subhash Chandra Bose And prosenjit Chatterjee controversy)

शनिवारी राष्ट्रपती भवनात नेताजींच्या पोर्ट्रेटचे (तैलचित्र) अनावरण करण्यात आले. त्यासंदर्भात राष्ट्रपती भवनातून संबंधित ट्विटही करण्यात आले होते. या ट्विटमध्ये राष्ट्रपती भवनाने दोन फोटो शेअर केले होते.

हे पोट्रेट (तैलचित्र) तयार करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कलाकार परेश माती यांना नेताजींच्या कुटुंबीयांनी हे तैलचित्र दिले होते. दुसरीकडे, सोशल मीडियावरील काही लोक असे म्हणतात की हे चित्र अभिनेता प्रसेनजीत यांचे आहे. तर काही लोक या दोन्ही गोष्टींना नकार देत आहेत.

फॅक्ट न्यूजमध्ये काय समोर आलं…?

सोशल मीडियावरील वाद लक्षात घेता, या प्रतिमेची आणि पोर्ट्रेटची तुलना केल्यास बरीचशी समानता आढळते. ‘टोपीचा झुकाव, टोपीवरील पानांच्या सारख्या डिझाइनची स्थिती, ओठ, त्यांच्या डोळे….’, मात्र असं जरी असलं तरी तो राष्ट्रपती कोविंद यांनी अनावरण केलेला फोटो हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाच होता असं आता अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्टचेकमधून समोर आलं आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने कोणता फोटो ट्विट केला होता…?

या वादानंतर आणखी एक फोटो समोर आला आहे. 11 जानेवारी 2020 रोजी हा फोटो सुभाष चंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी शेअर केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी एनडीए सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केले. विशेषत: नरेंद्र मोदी यांचे कौतुक या ट्विटमधून केले होते. त्यांच्या नातवाने केलेल्या ट्विटमधलाच फोटो आता राष्ट्रपती भवनात दिसून येत आहे.

प्रसादजित चॅटर्जी-सुभाषचंद्र बोस यांच्यातील फोटोचं कनेक्शन काय?

प्रसादजित चटर्जी यांनी जीते मुखर्जी दिग्दर्शित ‘ग्लूनामी’ चित्रपटात नेताजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रसेनजितचा लूक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी अगदी मिळता जुळता आहे.

अल्ट न्यूज काय आहे?

सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज पसरवल्या जातात. याच फेक न्यूजचं सत्य शोधण्याचं काम अल्ट न्यूज करते. अल्ट न्यूज ही फॅक्ट चेकर वेबसाईट आहे. ही बेबसाईट अनेक फेक फोटो किंवा बातमीपाठीमागचं सत्य पडताळते.

(RaShtrapati Bhavan Clariffication on Subhash Chandra Bose And prosenjit Chatterjee controversy)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.