कारागृहातून महिला कैदी फरार, साडीची दोरी बांधून…, पोलीस प्रशासनात खळबळ

एका महिला कैदेने तुरुंगातून साडीचा आधार घेऊन पलायन केलं आहे. त्यामुळे जेल प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा त्या महिलेचा शोध घेत आहे.

कारागृहातून महिला कैदी फरार, साडीची दोरी बांधून..., पोलीस प्रशासनात खळबळ
female prisoner
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2023 | 12:25 PM

मुंबई : एका महिलेने साडीचा आधार घेऊन तुरुंगातून पलायन केलं आहे. महिला कैदी (female prisoner) तुरुंगातून पळून गेल्याने पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. ही महिला नेपाळची (NEPAL WOMAN) रहिवासी असल्याची माहिती समजली आहे. पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहे. तुरुंगाच्या आजूबाजूचे सगळे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. त्या महिलेची पोलिस प्रत्येकजागी चौकशी करीत आहेत. त्या महिलेला २०२१ मध्ये अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा (NDPS Act) या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या असणाऱ्या महिलेचं वय २५ आहे, त्याचबरोबर त्या महिलेचं नाव अनुष्का आहे. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ पुरवल्याचा आरोप त्या महिलेवरती करण्यात आला आहे. महिला नशेची तस्करी करीत असताना ताब्यात घेतली आहे. रविवारी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या महिलेने साडीच्या साहाय्याने पळून गेली आहे.

शोधण्यासाठी पथक

ही घटना उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ परिसरात घडली आहे, एसपी लोकेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे की, ही महिला विचाराधीन कैदी होती. विशेष म्हणजे लवकरचं तिच्या प्रकरणाचा निकाल लागणार होता. त्याच्या आगोदर ती महिला फरार झाली आहे. त्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथक तयार केली आहेत. ती महिला नेताळच्या धार जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या प्रकरणावरती अधिक बोलायला तयार नाहीत. परंतु त्या महिलेला लवकरचं ताब्यात घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे.

महिला कैदी फरार झाल्यामुळे जेल प्रशासनं पुर्णपणे हादरलं आहे. जेलची सुरक्षा व्यवस्थेला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक महिला साडीचा आधार घेऊन पळून जाते, त्याची साधी कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे पोलिसांचा विषय हास्यास्पद झाला आहे.