‘ब्लू ड्रम’ प्रकरणात अखेर न्यायालयाचा मोठा निर्णय, मुस्कान अन् साहिलला कोर्टाने काय सुनावली शिक्षा?
मोठी बातमी समोर येत आहे. ब्लू ड्रम हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 3 मार्च 2025 मध्ये ही घटना घडली होती.

मोठी बातमी समोर येत आहे. ब्लू ड्रम हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठचे जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी या महिलेनं आपला पती सौरभ राजपूत याची आपला प्रियकर साहिल शुल्काच्या मदतीने हत्या केली होती. 3 मार्च 2025 मध्ये ही घटना घडली होती. मुस्कान रस्तोगी या महिलेनं आपला प्रियकर साहिल शुल्का याच्या मदतीने आपलाच पती सौरभ राजपूत याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. या घटनेनं संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता या दोन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुस्कान रस्तोगी या महिलेचं लग्न सौरभ राजपूत या तरुणाशी झालं होतं. सौरभ राजपूत हा मर्चट नेव्हीमध्ये नोकरी करत होता. 2 वर्षानंतर, तो 24 फेब्रुवारीला 2025 मध्ये आपली पत्नी मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनमधून भारतात आला होता. त्यानंतर त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये मुस्कानने आपल्या प्रियकरासोबत मिळून सौरभ राजपूत याची हत्या केली. या प्रकरणात आतापर्यंत जी-जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आधी मुस्कानने आपल्या पतीच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्याचं मुंडक धडावेगळं केलं. त्यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून त्याचे अवयव ब्लू ड्रममध्ये भरण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ड्रममध्ये न मावल्याने त्यांनी सौरभच्या अवयवांचे आणखी छोटे तुकडे केले.
ही घटना जेव्हा समोर आली, तेव्हा संपूर्ण देश या हत्याकांडाने हादरून गेला होता. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला. त्यानंतर न्यायालयाने आता या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठचे जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला आहे. त्यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.