Petrol Diesel Price : तेलाच्या किमतीचा भडका; पेट्रोल आणि डिझेलचे जाणून घ्या आजचे दर..

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठा भडका उडाला आहे. त्यामध्येच आता भारताच्या शेजारील देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. जाणून घ्या आजचे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.

Petrol Diesel Price : तेलाच्या किमतीचा भडका; पेट्रोल आणि डिझेलचे जाणून घ्या आजचे दर..
Petrol Diesel Price
| Updated on: Jul 13, 2026 | 7:54 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, त्यानंतर पुन्हा मोठे आणि तीव्र हल्ले इराणवर केले. अनेक भागात त्यांनी हल्ले केले. त्यांच्या या हल्ल्याला जोरदार उत्तर इराणकडून देण्यात आले. इराणने थेट होर्मुज खाडीही बंद केली. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात भडका उडाला. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताच दुसरीकडे पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ केली. ज्यावेळी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होते, त्यावेळी भारतात तब्बल 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. जर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव असाच कायम राहिला तर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्येच आज 13 जुलै 2026 चे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर झालेत.

इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात खळबळ उडाली. भारतात 13 जुलै 2026 ला पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणत्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. हा भारतीय तेल कंपन्यांचा मोठा निर्णय आणि सर्वसामान्यांना दिलासा म्हणावा लागणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सध्या तेल कंपन्यांवर मोठा दबाव आहे.

पाकिस्तानच्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. 25 मे 2026j रोजी भारतीय तेल कंपन्यांनी शेवटची पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केले होते. पाकिस्तानमध्ये गेल्या शनिवारपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 13.18 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 13.80 रुपयांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढताना दिसत आहेत.

तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे. कोलकातामध्ये हा दर 113.51 रुपये, मुंबईत 111.21 रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 95.20bरुपये इतका आहे. कोलकातामध्ये दर प्रति लिटर 99.02 रुपये, मुंबईत 97.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 99.55 रुपये आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत.

Follow Us