AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड… जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव, थेट..

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याचा परिणाम थेट जागतिक बाजारावर होत आहे. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे.

Petrol Diesel Price : तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड... जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव, थेट..
Petrol Diesel Price
| Updated on: Jul 11, 2026 | 7:56 AM
Share

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारांवर चर्चा होत असताना किमती कमी झाल्या होत्या. होर्मुज खाडीतही परिस्थिती सामान्यच होती. मात्र, होर्मुज खाडी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानतंर अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले करण्यास सुरूवात केली. इराणच्या महत्वाच्या आठ ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले. रेल्वे पूलही उडवून देण्यात आला. युद्धविराम शांतता कराराची चर्चा देखील बंद आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (International Energy Agency) दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील कच्च्या तेलाचे उत्पादन आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी नरमाई आली.

या तणावात सतत तेलाच्या किमती कमी अधिक होत आहेत. यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात चार वेळा केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. आताही तेलाच्या किमती वाढत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांना दिलासा देत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल सरकारी तेल कंपन्यांनी केले नाहीत

भारतात सरकारी तेल कंपन्यांनी 11 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरताना दिसले. त्यावेळी चर्चा होती की,  भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारकडून कमी केले जाऊ शकतात.

त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जर स्थिती अशीच राहिली तर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली जाऊ शकते. इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. भारतात थेट महागाई वाढली. ज्याच्या झळा सर्वसामान्य लोकांनाही बसल्या. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु