AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचा 10 जुलैचा भाव जाहीर, पेट्रोल कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, थेट..

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. यादरम्यानच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत मोठी अपडेट आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचा 10 जुलैचा भाव जाहीर, पेट्रोल कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, थेट..
Petrol Diesel Price
| Updated on: Jul 10, 2026 | 7:48 AM
Share

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. इराणवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना आता जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने थेट जागतिक बाजारात खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार सुरू असताना कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसल्या. सतत किमती घसरत असल्याने पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याचा अंदाज होता. ज्यावेळी हे युद्ध सुरू होते, त्यावेळी तब्बल चार वेळा भारतात पेट्रोल डिजेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरताना आता भारतातही पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, असा अंदाज असतानाच जागतिक बाजारात खळबळ उडाली असून सतत भाव वाढत आहेत.

यादरम्यानच भारतीयांसाठी आज दिलासाजनक बातमी आहे. तेल कंपन्यांकडून थेट मोठा दिलासा मिळाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असताना भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या भावाता कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. कच्चे तेल 76 डॉलर प्रति बॅरल झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची वाढ भारतात करण्यात आली नाही.

केंद्र सरकारकडून नागरिकांना हे मोठे गिफ्टच म्हणावे लागेल. एक बॅरल कच्च्या तेलात जर 10 डॉलर वाढतात त्यावेळी भारतीय ऑयल मार्केटिंग कंपन्यांना 6 रूपये प्रति लीटर नुकसान सहन करावे लागते. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे.मुंबईत 111.21 रुपये आहे. कोलकातामध्ये 113.51 रुपये आणि चेन्नईमध्ये 107.77 रुपये इतका आहे.

दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये आहे. कोलकातामध्ये हा दर प्रति लिटर 99.02 रुपये, मुंबईत 97.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 99.55 रुपये इतका आहे. इराणशी संबंधित संघर्ष सुरू झाल्यापासून या किमतीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तरीही भारतीय तेल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची कच्च्या तेलाच्या भावात वाढ केली नाही.

Follow Us
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा