Jammu : कटराहून जम्मूकडे येणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू, 22 जणांना आगीच्या झळा

| Updated on: May 13, 2022 | 9:17 PM

एडीजीपी जम्मू यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, बसच्या इंजिनला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण बसला आगीची भक्ष झाली

Jammu : कटराहून जम्मूकडे येणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू, 22 जणांना आगीच्या झळा
बसला आग
Image Credit source: tv9
Follow us on

जम्मू: जम्मूमध्ये (Jammu) शुक्रवारी एक भीषण घटना घडल्याचे समोर आली असून ज्यात बसला आग लागल्याचे उघड झाले आहे. ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला. तर या आगीमुळे 20 हून अधिक जण भाजले गेल्याची माहित मिळत आहे. याचबरोबर या आगीमुळे (Fire) 3 जण गंभीर भाजल्याचेही सांगितले जात आहे. तर सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कटरा येथील नोमाई भागातून जम्मूकडे जाणाऱ्या एका बसला (Bus) संशयास्पद परिस्थितीत आग लागली. हा अपघात कटरापासून 1.5 किमी अंतरावर असलेल्या खरमलजवळ झाल्याचे एडीजीपी जम्मू यांनी सांगितले. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन दलाने बसची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचेही एडीजीपी जम्मू यांनी सांगितले.

यात्रेकरूंच्या बसला आग

मिळालेल्या माहितीनुसार, कटराहून येणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंच्या बसला शुक्रवारी आग लागली. बस कटराहून जम्मूला जात होती. कटरा येथून सुमारे तीन किमी अंतरावर नोमाईजवळ ही घटना घडली. या अपघातात 4 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 22 जण भाजले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. यावेळी अग्निशमन दलाने बसची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

इंजिन आग लागल्याने दुर्घटना

एडीजीपी जम्मू यांनी सांगितले की, कटरापासून 1.5 किमी अंतरावर असलेल्या खरमलजवळ हा अपघात झाला. बस कटराहून जम्मूला जात होती. प्राथमिक माहितीनुसार, बसच्या इंजिनला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण बसला आगीची भक्ष झाली.