Sheikh Hasina: फाशीची शिक्षा, तरीही मायदेशी परतणार, शेख हसीना यांचा मोठा निर्णय
ऑगस्ट 2024 मधील आंदोलनानंतर सध्या भारतात निर्वासन काळात असलेल्या हसीना यांच्यावर आंदोलकांवरील हिंसक कारवाईप्रकरणी खटला चालवून अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sheikh Hasina News: बांगलादेशमध्ये झालेल्या मोठ्या सत्ता संघर्षानंतर भारतामध्ये आश्रयास आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतणार असल्याचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. शेख हसीना यांनी सर्व कायदेशीर धोके आणि फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार असतानाही आगामी डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची ठाम घोषणा केली आहे. नेमकं काय म्हणाल्यात शेख हसीना? जाणून घ्या सविस्तर…
फाशीची शिक्षा तरीही मायदेशी परतणार, शेख हसीना यांचा मोठा निर्णय!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सर्व कायदेशीर धोके आणि फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार असतानाही आगामी डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची ठाम घोषणा केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेख हसीना या भारतात वास्तव्यास आहेत. ऑगस्ट 2024 मधील आंदोलनानंतर सध्या भारतात निर्वासन काळात असलेल्या हसीना यांच्यावर आंदोलकांवरील हिंसक कारवाईप्रकरणी खटला चालवून अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेख हसीना यांनी हा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे.
बांगलादेशात पाऊल ठेवताच आपल्याला अटक, छळ किंवा थेट मृत्यूला सामोरे जावे लागू शकते, याची पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संकटकाळात आपल्याला आश्रय दिल्याबद्दल भारताचे मनःपूर्वक आभार मानत असतानाच, आपल्या परतीसाठी भारत किंवा इतर कोणत्याही परकीय देशाने बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, अशी आपली कोणतीही अपेक्षा नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईत दोषी!
दरम्यान, ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये मोठा सत्तासंघर्ष उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेशातील गुन्हे लवादाने जुलै- ऑगस्ट 2024 मधील आंदोलनावेळी झालेल्या हिंसक कारवाईप्रकरणात त्यांना दोषी ठरवत नोव्हेंबर 2025 मध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अशातच आता त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय जाहीर केला आहे.