मी भाजप समर्थक…सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं मोठं विधान, सीजेपीवरही महत्त्वाचं बोलले
सप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं काँग्रेस आणि भाजपवर मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काँग्रेस, भाजपसहित विविध राजकीय पक्षावर टीका केली.

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सर्व राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. मला भारतातील कोणताही राजकीय पक्ष आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीची देखील खिल्ली उडवली. त्यांनी भाजप आणि काँग्रेसचा उल्लेख केला. मी काँग्रेस आणि इतर पक्षाचा टीकाकार असलो तरी भाजपचा समर्थक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काटजू यांनी म्हटलं की, मी अनेकदा काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे अनेकांना मी भाजपचा समर्थक वाटतो. परंतु हे चुकीचं आहे. मी काँग्रेस, भाजपसहित सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात आहे. मी त्यांना निरुपयोगी मानतो. त्यांना फक्त सत्ता आणि पैसा हवा आहे. या राजकीय पक्षांना जनतेशी प्रेम नाही’. असं म्हणत माजी न्यायाधीशांनी राजकीय पक्षाच्या मतदान मागण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला.
‘आताचे राजकीय पक्ष हे समाजात फूट, दोन समाजात तेढ, द्वेष पसरवण्याचे कार्य करतात. मला विश्वास आहे की, भविष्यात देशभक्त, आधुनिक विचारांचे, धर्मनिरपेक्ष नेते समोर येतील. भारताच्या नव्याने उभारणीसाठी जन आंदोलनाचं नेतृत्व करतील,असे माजी न्यायाधीशींनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, देश संकटात येतो, त्यावेळी नवी नेते समोर येतात. खरंतर अशा नेत्यांना आधी कोणीच ओळखत नसतं. उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये ऑलिव्हर क्रॉमवेल, 1789 साली फ्रान्समध्ये रॉबेस्पियर, 1917 साली रशियामध्ये लेनीन यांची एन्ट्री झाली. परंतु नव्या नेतृत्वाला वेळ लागतो. आतापर्यंत भारतात नवा नेता अजून उदयास आलेला नाही. मला खात्री आहे की, एक दिवस नक्कीच उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काटजू यांनी मागील एका पोस्टमध्ये कॉक्रोच जनता पक्षावर निशाणा साधला. त्यांनी सीजेपी नेत्यांनी बाँडवर केलेल्या स्वाक्षरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी बाँडवर सही केली असेल, तर त्यांनी पुढे आंदोलन करणार नसल्याचे वचन दिले. त्यांना आता आंदोलन केलं, तर पोलीस त्यांना शांतता भंग केल्याचा आरोपाअंतर्गत ताब्यात घेतील. बाँडचं उल्लंघन केल्याप्रकरणी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना तुरुंगात डांबले जाईल. आता ते काही दिवसांसाठी तुरुंगात होते. पुढे त्यांना काही महिन्यांसाठी तुरुगांत डांबले जाईल. ते तुरुंगात जायला घाबरतात. त्यामुले सीजेपी संपली आहे, असा दावा माजी न्यायाधीशांनी केला.