कंबोडियन गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी गँगस्टरला मिळाला १२ तासांचा पॅरोल, दोघांनाही प्रत्येकी चार मुले..

कंबोडियन गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी गँगस्टरला चक्क १२ तासांचा पॅरोल मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होते. गँगस्टर गँगस्टर मैनपाल बादली यांचे एका कंबोडियन महिलेशी लग्न होत आहे.

कंबोडियन गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी गँगस्टरला मिळाला १२ तासांचा पॅरोल, दोघांनाही प्रत्येकी चार मुले..
| Updated on: Sep 24, 2026 | 9:40 PM

हरियाणा पोलिस गँगस्टर मैनपाल बादली याला त्याच्या लग्नासाठी तरुंगातून लग्न स्थळी घेऊन आली आहे. कोर्टाने मैनपाल बादली याला त्याच्या या लग्नासाठी १२ तासांचा पॅरोल दिला आहे. मैनपाल बादली त्याच्या कंबोडीयन महिला पार्टनरशी विवाह करीत आहे. गँगस्टर मैनपाल बादली याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत.ज्यात हत्या, लुटमार आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

कोण आहे गँगस्टर मैनपाल बादली ?

झज्जर तिल्ह्यातील बादली गावाचा रहिवासी असलेला मैनपाल एक मॅकनिक म्हणून टॅक्टर रिपेरिंगचे काम करायचा. तो साल २००० मध्ये त्याच्या काकाच्या हत्येच्या प्रकरणात चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ अनेक मर्डर आणि हत्येचे प्रयत्नाचे गुन्हे केले. त्याने अन्य कोणत्याही गँगमध्ये न जाता स्वत:चे गुन्हेगारी नेटवर्क उभारले.

साल २०१४ मध्ये भोंडसी जेलमध्ये राहताना त्याच्यावर अन्य एका कैद्याची चाकू खूपसून हत्या केल्याचा आरोप होता. हत्येच्या तीन वेगवेगळे प्रकरणात २०१० मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. जुलै २०१८ मध्ये पॅरोल मिळाल्यानंतर सहा आठवड्यासाठी बाहेर आला आणि पुन्हा गेला नाही. त्याने सोनु कुमार नावाने खोटे कागदपत्रे तयार करुन गुरुग्रामच्या एका खोट्या पत्त्यावर पासपोर्टवर बनवला. फरार झाल्यानंतर त्याच्यावर ५ लाख रुपयांच्या बक्षिस लावले होते आणि २०१९ मध्ये कोर्टाने त्याला फरार घोषीत केले होते. त्यानंतर तो ७ जुलै २०१९ नंतर कोलकाता आणि बँकॉकच्या मार्गे कंबोडियात पळाला. रस्त्यात मॉरिशस आणि इंडोनेशियात त्याने प्रवास केला. अखेर त्याने कंबोडियातील सिएम रीप शहरात त्याने त्याचा अड्डा तयार केला.

हरियाणा एसटीएफने जेव्हा कंबोडियात मैनपालची खरी ओळख स्पष्ट केली. तेव्हा इंटरपोलने विदेश मंत्रालय आणि सीबीआयच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दबाव बनवला. कंबोडिया प्रशासनाने होकार दिल्यानंतर एसटीएफच्या एका टीमने कंबोडियात जाऊन मैनपाल याला ताब्यात घेऊन भारतात पाठवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us