IAS टीना दाबी पतीपासून ‘दूर’, राजस्थान सरकारने घेतला हा मोठा निर्णय…

| Updated on: Oct 28, 2022 | 8:02 PM

आयएएस अधिकारी टीना दाबी आणि डॉ. गावंडे यांचा विवाह या वर्षाच्या प्रारंभीच जयपूरमध्येच झाला होता.

IAS टीना दाबी पतीपासून दूर, राजस्थान सरकारने घेतला हा मोठा निर्णय...
Follow us on

नवी दिल्लीः राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने आज एक मोठा निर्णय घेतल्यामुळे सुमारे 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर त्यातील महत्वाची एक बदली करण्यात आली आहे, ती म्हणजे आयएएस अधिकारी टीना दाबी यांच्या पतीची. टीना दाबी यांचे पती के. गावंडे यांना बिकानेरमध्ये त्यांची आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

याबरोबरच गेहलोत सरकारने एम. एल. चौहान यांची उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून तर सुनील शर्मा यांची महाविद्यालयीन शिक्षण विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आला आहे.

पुखराज सेन यांची अन्न सुरक्षा आणि औषध नियंत्रण आयुक्तालय, प्रताप सिंग यांची संचालक, स्वच्छ भारत मिशन, जयपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक टीना दाबी आहेत. त्या सध्या राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत.

गेल्या आठवड्यात टीना दाबींचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्या फटाके वाजवताना दिसत होत्या.

आयएएस अधिकारी टीना दाबी आणि डॉ. गावंडे यांचा विवाह या वर्षाच्या प्रारंभीच जयपूरमध्येच झाला होता. आणि त्यांच्या विवाहाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

त्यांचा साखरपुडा, लग्न आणि रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. टीना दाबी यांचे सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

गेहलोत सरकारने बदली केलेल्यांमध्ये बिकानेर आणि जयपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये अंतर सिंग नेहरा हे जयपूरचे विभागीय आयुक्त असतील.

तर आयएएस नवीन महाजन यांना पीडब्लूडीच्या प्रधान सचिव पदावरून हटवून राजस्थान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव वैभव गलरिया यांची पीडब्ल्यूडी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सीएम गेहलोत यांनी गुरुवारी मुख्याध्याधिकारांची बैठक घेतली होती. ज्यामध्ये सीएम गेहलोत यांनी नवीन महाजन आणि वैभव गलरिया यांच्या कामकाजावर राज्यातील रुग्णालयांमधील खराब रस्ते आणि अस्वच्छता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

बैठकीनंतर सीएम गेहलोत यांनी आज दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, या बैठकीत त्यांनी योजना आणि प्रकल्प राबविताना ते गतीने राबवा असंही त्यांनी सांगितले आहे.