बकरीच्या केसांनी उघडला खुनाच थरार… कसा तवडीत सापडला एका निष्पाप मुलीचा मारेकरी?

घाणेरड्या हेतूने 10 वर्षीय मुलीला खोलीत घेऊन गेला, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक, बकरीच्या केसांमुळे उघडला खुनाच थरार... 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? जाणून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

बकरीच्या केसांनी उघडला खुनाच थरार... कसा तवडीत सापडला एका निष्पाप मुलीचा मारेकरी?
| Updated on: Apr 29, 2026 | 8:20 AM

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी मागे एखादा पुरावा सोडतोच. गुन्हेगाराने मागे सोडलेला पुरावाच पोलिसांसाठी फार उपयोगी ठरला. राजधानीच्या शहरी भागात एका 10 वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अशीच एक घटना घडली. पुरावा नष्ट करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्यापर्यंत काही बकरीच्या केसांमुळे पोलीस पोहोचले. ही घटना राजधानीच्या बायपास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जल्ला महावीर मंदिराच्या जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी एका अरुंद गल्लीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. ती मुलगी घरून दूध आणायला निघाली होती, पण नंतर परत आलीच नाही. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप उसळला आणि पोलिसांवर लवकरात लवकर प्रकरण उघडकीस आणण्याचा दबाव वाढत गेला.

पाटणा एसएसपी कार्तिकेय के. शर्मा यांनी सांगितल्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांचं लक्ष त्या ब्लँकेटकडे गेलं ज्यात मृतदेह गुंडाळलेलं होता. कसून तपासणी केल्यावर त्या ब्लँकेटला बकरीचे केस चिकटलेले आढळले. पोलिसांनी अंदाज बांधला की, आरोपी याच परिसरात राहत असावा आणि त्याच्याकडे बकऱ्या असाव्यात.

गल्लीची झडती सुरू केली असता एका खोलीबाहेर चार-पाच बकऱ्या बांधलेल्या दिसल्या. त्या खोलीला बाहेरून कुलूप होतं. अशात पोलिसांना तेथे संशय आल्याने, त्यांनी घराचा कुलूप तोडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी रंजीत लपून बसलेला पोलिसांना आढळला. आरोपीने बाहेरून कुलूप लावलं होतं आणि स्वतः आत पंख्याशिवाय बसला होता. घामाने त्याचं अंग भिजलं होतं, पण खिडकीतून तो पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता.

कडक चौकशीत रंजीतने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की, वाईट हेतूने मुलीला आपल्या खोलीत घेऊन गेला. मुलगी ओरडू लागल्यावर त्याने खोलीतील पाटा-वरवंट्याच्या दगडाने तिच्या डोक्यावर हल्ला केला आणि ती जागीच मृत्युमुखी पडली.
आरोपीने 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह दिवसभर पलंगाखाली लपवून ठेवलेला. रात्री सुमारे दोन वाजता मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून जवळच्या तलावात फेकायला निघाला. पण वाटेत पोलिसांची गस्त दिसल्याने घाबरून त्याने मृतदेह मध्येच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ टाकला आणि पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Follow Us