Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दोन दिवस उलटूनही मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा आढळलेला नाही.
पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दोन दिवस उलटूनही मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा आढळलेला नाही. 25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने काही नातेवाईकांना घरी जेवणासाठी बोलावले होते. रात्री सुमारे 10 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर नातेवाईक निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबीयांनी फ्रीजमध्ये ठेवलेले कलिंगड खाल्ले आणि झोपले.
पहाटे सर्वांना उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात दोन महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. जे नातेवाईक त्याच जेवणात सहभागी झाले होते, त्यांना कोणतीही विषबाधा झालेली नाही. तसेच, ज्या दुकानातून कलिंगड खरेदी करण्यात आले होते, त्या संदर्भातही कोणतीही तक्रार आढळलेली नाही. त्यामुळे या मृत्यूमागे इतर कोणते कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
Published on: Apr 28, 2026 05:23 PM
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू

