India New Army Chief : पुण्यात शिकलेला मुलगा होणार देशाचा पुढचा लष्करप्रमुख, सरकारकडून नावाची घोषणा

India New Army Chief : देशाच्या पुढच्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. पुण्यात NDA मध्ये शिकून अधिकारी म्हणून बाहेर पडलेला मुलगा देशाचा पुढचा लष्करप्रमुख असेल.

India New Army Chief : पुण्यात शिकलेला मुलगा होणार देशाचा पुढचा लष्करप्रमुख, सरकारकडून नावाची घोषणा
lt general dhiraj seth
| Updated on: Jun 13, 2026 | 4:30 PM

भारतीय लष्कराच्या नेतृत्वात एक मोठा बदल होणार आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे पुढचे लष्करप्रमुख असतील. केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण क्षेत्रातील एक दीर्घ आणि शानदार अनुभव आहे. ते 30 जूनपासून आपला पदभार संभाळतील. धीरज सेठ यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत स्टेटमेंटनुसार, राष्ट्रपतींनी भारतीय सैन्याचे पुढचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते जनरलच्या स्थायी रँकसह 30 जून 2026 पासून विद्यमान लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं स्थान घेतील. नवीन लष्करप्रमुख या नात्याने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल.

जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत आहे. त्यांनी 30 जून 2024 रोजी भारतीय सैन्याचे प्रमुख आर्मी चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. धीरज सेठ हे पुण्यातील खडकवासला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1986 रोजी बख्तरबंद कोर मध्ये ते रुजू झालेले. वाळवंटी प्रदेशात बख्तरबंद रेजिमेंट, विकसित क्षेत्रात बख्तरबंद ब्रिगेड आणि जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी टीमचं नेतृत्व केलं आहे.

त्यांनी कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या संभाळल्यात?

लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ यांनी सैन्यात प्रत्येक स्तरावर जबाबदारी संभाळली आहे. वाळवंटी भागात आर्मर्ड रेजिमेंट, पश्चिमी आघाडीवर आर्मर्ड ब्रिगेड आणि जम्मू-कश्मीर मध्ये काउंटर इंसर्जेंसी फोर्सचं नेतृत्व केलय. लेफ्टिनेंट जनरल बनल्यानंतर भारतीय सैन्याची प्रमुख स्ट्राइक फॉर्मेशन सुदर्शन चक्र कोरचं नेतृत्व केलय. त्या शिवाय दिल्ली एरियात जनरल ऑफिसर कमांडिंग सुद्धा होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सैन्य मोहिमांची जबाबदारी संभाळली आहे.

40 वर्षांचा सैन्य अनुभव

धीरज सेठ यांच्याकडे 40 वर्षांचा सैन्य अनुभव आहे. त्यांनी वाळवंटी प्रदेश , जम्मू-काश्मीरसह पश्चिम आघाडी अनेक संवेदनशील क्षेत्रात नेतृत्व केलं आहे. आर्मी कमांडर म्हणून त्यांनी दक्षिण पश्चिम कमान आणि दक्षिणी कमान संभाळली आहे.दोन ऑपरेशनल आर्मी कमांड्सचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या निवडक अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. जनरल सेठ यांना सैन्याचं आधुनिकीकरण आणि क्षमता विकासातील योगदानासाठी सुद्धा ओळखलं जातं.

Follow Us