दूध-दही, गॅस आणि दारू महाग! सीएनजी-गॅस सिलेंडरचा भाव वाढला, बँक-Fastag चे नवीन नियम, 1 नोव्हेंबरपासून मोठे बदल
Major changes from November 1st 2026: आज 1 नोव्हेंबरपासून देशभरात मोठे बदल होत आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. दूध-दहीपासून ते दारूपर्यंत महागाईने हातापाय पसरले आहेत. तर बँकिंग आणि फास्टॅग नियमात बदल झाला आहे.

Major changes from November 1st 2026: आज 1 नोव्हेंबरपासून देशभरात मोठे बदल होत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. आता बँकिंग, पेन्शन, कर आणि इतर दैनंदिन खर्च वाढणार आहे. आज दिल्लीत GRAP लागू होईल. तर कर्नाटकमध्ये दूध आणि दहीच्या किंमतीत वाढ होत आहे. आजपासून LPG Cylinder च्या सबसिडीचे नियम बदलणार आहेत. सीएनजी महाग होणार आहे. तर बँकिंग आणि फास्टॅग नियमात बदल झाला आहे.
काय काय बदलणार, काय महाग?
यातील बदल संपूर्ण देशात सारखे नाहीत. काही नियम देशभरासाठी आहेत. तर काही केवळ काही राज्यांपूरते मर्यादित आहेत. पण बँकिंग, सीएनजी, एलपीजी सिलेंडर, फास्टॅगचा बदल हा आजपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे.
1.दिवाळीपूर्वीच एलपीजी सिलेंडर महाग
सरकारी तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. दिल्लीत 19 किलो सिलेंडर 10 रुपयांनी महाग झाला. नवीन दर 2,820 रुपये इतके आहे. तर चेन्नईत सर्वाधिक 11.50 रुपयांची वाढ झाली. दक्षिणेतील राजधानीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,994.50 रुपये इतकी आहे. मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडर आता 2,764 रुपयांना मिळत आहे.
2.. सीएनजी पुन्हा महाग
उत्तर भारतात ग्रीन गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 2.25 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. महाराष्ट्रात अद्याप सीएनजी महाग होण्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या महिन्याच्या सुरूवातीला सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. आता राज्यात सीएनजी महाग झालेला नाही.
3. दारू 10 रुपयांनी महाग
तामिळनाडू सरकारने दारुची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यात दारू 10 रुपयांनी महाग झाली आहे. नवीन किंमत आजपासून लागू झाली आहे. अर्थात दारूची बाटली परत करणाऱ्या ग्राहकांना दहा रुपये देण्यात येणार आहे.
4. दूध आणि दहीच्या दरात वाढ
कर्नाटक राज्यात आजपासून दूध प्रति लिटर 8 रुपयांनी महागले आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजूरी दिली. या दरवाढीतील 7 रुपये शेतकऱ्यांना आणि 1 रुपया दूध महासंघ, डेअरींना देण्यात येणार आहे. तर एक किलो दही 14 रुपयांनी महाग झाले आहे.
5. पेन्शनर्ससाठी नियमात बदल
सरकारी पेन्शन मिळवणाऱ्या 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या निवृत्तीवेतनधारक 1 नोव्हेंबरपासून त्यांचे हयात प्रमाणपत्र दाखल करू शकतील. हे प्रमाणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर 2026 ही आहे. हे प्रमाणपत्र जमा न केल्यास पेन्शन थांबू शकते. 80 वर्षांपेक्षा अधिक वयोमानाच्या निवृत्तीधारकांसाठी ही प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
FASTag च्या वार्षिक पासमध्ये सवलत
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, टोल नाक्याजवळील 20 किलोमीटर परिघातील स्थानिक नागरिकांना वार्षिक लोकल फास्टॅगची व्यवस्था आजपासून 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. जर टोल नाका हा नगरपालिकेच्या हद्द नसेल तर वार्षिक शुल्क 1,500 रुपये तर नगरपालिका हद्दीत 3000 रुपये इतके असेल.