ढीगारा झाला कुबेराचा खजाना, ज्याला जे नाणे मिळाले तो घेऊन पळाला, खोदकामासाठी लोकांची गर्दी…

गुजरातच्या बनासकांठा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील पालनपूर शहराच्या मानसरोवर परिसरात एका घराच्या ढिगाऱ्यातून अचानक चांदीची नाणी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

ढीगारा झाला कुबेराचा खजाना, ज्याला जे नाणे मिळाले तो घेऊन पळाला, खोदकामासाठी लोकांची गर्दी...
Banaskantha Palanpur Silver Coins
| Updated on: Jul 31, 2026 | 10:14 PM

Banaskantha Palanpur Silver Coins: गुजरात राज्यातील बनासकांठा येथून एका धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पालनपूर येथे मानसरोवर भागात जमा केलेल्या ढीगाऱ्यातून अचानक चांदीची नाणी सापडू लागल्याचा दावा केला जात आहे. गुजरात येथील बनासकांठाच्या पालनपूरात एका आश्चर्यकारक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहरातील लोकांच्या उत्सुकता ताणली गेली आहे.

येथील मानसरोवर भागातील एका जुन्या पाडकामाच्या ढीगाऱ्यातून अचानक चांदीची नाणी लोकांना सापडल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी मिळाल्यानंतर लोकांनी घटना स्थळी धाव घेतली. पाहाता पाहाता येथे लोकांची मोठी गर्दी जमली. लोकांनी मिळेल त्या वस्तूंच्या सहाय्याने खोदकाम सुरु केले आहे.

असे म्हटले जात आहे की मानसरोवरच्या जवळ एका उजाड जमिनीवर एक दिवसांपूर्वी जुने घराच्या किंवा दुकानाचा राडारोडा डम्प करण्यात आला होता. या ढीगाऱ्यातून चांदी नाणी सापडत असल्याचे वावड्या वाऱ्याच्या वेगाने पसरल्या. आणि माहिती मिळले तसे लोक या ठिकाणी चांदीची नाणी शोधायला आले.

जेथे जागा मिळेल ते ढीगाऱ्याचे खोदकाम लोकांनी सुरु केले आहे. ज्या लोकांना ही नाणी मिळाली ते आपल्या सोबत घेऊन निघून गेले आहेत. काही वेळानंतर ही बातमी संपूर्ण पालनपूर शहरात पसरली आणि मोठ्या संख्येने लोक येथे पोहचले.

घटनास्थळी खूपवेळापर्यंत लोकांची गर्दी जमू लागली होती. जुनी चांदीची नाणी सापडल्याबद्दल वेग-वेगळ्या चर्चा होत होती. मात्र, ही नाणी किती जुनी आहेत आणि कोणत्या काळातील आहेत.त्यांचा सध्या किती भाव आहे या संदर्भात कोणताही अधिकृत दुजारो मिळालेला नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us