सबरीमाला देवस्थानाच्या विकासासाठी गुजरातच्या मल्याळी वकीलांचा पुढाकार

केरळ राज्यातील सबरमाला देवस्थानाच्या विकासासाठी गुजरात येथील एका मल्याळी वकीलाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी देवस्थानाकडे सहा कलमी मागण्या केल्या असून त्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

सबरीमाला देवस्थानाच्या विकासासाठी गुजरातच्या मल्याळी वकीलांचा पुढाकार
| Updated on: Sep 23, 2025 | 6:43 PM

सबरीमाला देवस्थानाच्या विकासासाठी गुजरातच्या मल्याळली कम्युनिटीतील एका वकीलाने पुढाकार घेत अनेक मागण्यासाठी केरळ राज्याकडे केल्या आहेत. लोक केरळ सभा आणि वर्ल्ड मल्याळली कौन्सिलचे ग्लोबल व्हाईस चेअरमन म्हणून दिनेश नायर यांनी भाविकांच्या तीर्थयात्रेचा अनुभव वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या मागण्या केल्या आहेत. सबरीमाला मंदिराचे पावित्र्य आणि परंपरा सांभाळून हा विकास केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सबरीमाला देवस्थान हे भारताच्या केरळ राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्यात असून ते एका टेकडीवर वसलेले आहे. हे देवस्थान भगवान अय्यप्पांचे पवित्र निवासस्थान मानले जाते. गुजरात येथील मल्याळम कम्युनिटीतील महत्वाचे असलेल्या वकील दिनेश नायर यांनी सबरीमाला या देवस्थानाच्या विकासाची मागणी केली आहे.

नायर यांनी 6 प्रमुख भागावर लक्ष पुरवण्यास सांगितले आहे

1- वाहतूक सुविधेत वाढ करावी:

– केएसआरटीसी सेवेत वाढ करावी

– आंतरराज्यीत बसेस वाढवाव्या

– जनतेच्या सोयीसाठी रोप-वे उभारावा

2. यात्रेकरुंसाठी सोयी आणि पायाभूत सुविधा:

– इको फ्रेंडली शेल्टर, वसतीगृहे आणि विश्रांतीगृहे

– स्वच्छ शौचालये, न्हानी घरे आणि पिण्याचे पाणी

– दर्शन बुकींगसाठी डिजिटल टोकन सिस्टीम

– ज्येष्ठ आणि अपंग श्रद्धाळूंसाठी समर्पित मदत सेवा

3. आरोग्य आणि सुरक्षा :

– कायमस्वरुपी मल्टी स्पेशालिटी मेडीकल केंद्र

– आपात्कालिन व्यवस्थापन युनिट

– बल्ड डोनेशन आणि प्रथमोपचार स्वयंसेवकांचे नेटवर्क

4. पर्यावरण आणि शाश्वतता:

– घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी

– हरित ऊर्जा उपक्रम

– वनीकरण आणि नदीकाठचे संरक्षण

5. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रसार:

– सबरीमाला तीर्थयात्रा माहिती केंद्र

– वार्षिक आंतरराष्ट्रीय अय्यप्पा संशोधन आणि सांस्कृतिक परिषद

– जागतिक श्रद्धाळूंच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

6. प्रशासकीय आणि ग्लोबल सहभाग :

– ग्लोबल अय्यप्पा फेलोशिप

– मल्याळी डायस्पोरा संघटनांचा सहभाग

– निधीच्या वापर आणि विकास प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि लोकांचा सहभाग

प्रगतीसाठी एक पाऊल पुढे

या मागण्या करुन दिनेश नायर यांनी सबरीमालाच्या विकासासाठी मंदिराच्या परंपरांना धक्का न लावता आपण सकारात्मक योगदान देऊ इच्छीतो असे म्हटले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी श्रद्धाळूंच्या अनुभवात व्यापक सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. केरळ सरकार आणि देवस्थान बोर्डाने या मागण्यांकडे गंभीरपणे विचार करुन अधिक टीकाऊ आणि श्रद्धाळू स्नेही वातावरण तयार करण्याचे आवाहन देखील नायर यांनी केले आहे.