
विश्वास ठेवणे अवघड आहे, परंतु सिगारेट बट्समधून कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर अनेक जणांचे ‘नाही’ असे असणार आहे. परंतु तुमची जर वेगळा विचार करण्याची तयारी असेल तर ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असा प्रकार होऊ शकतो. कोट्यवधींची कमाई कचऱ्यात फेकून देणाऱ्या सिगारेट बट्समधून होऊ शकते. नवी दिल्लीतील युवा उद्योजक नमन गुप्ता यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांच्या कंपनीत कचऱ्यात फेकणाऱ्या सिगारेट बट्समधून खेळणी, कपडे आणि पेपर तयार केले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. या उद्योगात त्यांच्यासोबत अडीच हजार कर्मचारी आणि वितरकांची साखळी आहे. कल्पना आली कशी? नमन गुप्ता यांनी सिगारेट बट्सपासून व्यवसाय सुरु करण्याची कल्पना कशी आले? त्याची आठवण सांगताना म्हणतात, बालपणापासून माझे चार्टर्ड अकाउंटन्ट होण्याचे स्वप्न होते. 2013-14 मध्ये बारावी झाल्यानंतर मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी महाविद्यालयातील युवकांमध्ये सिगारेट ओढण्याचा ट्रेंड असल्याचे लक्षात...