वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी लढा देणाऱ्या हिमप्रियाच्या धैर्याला जग आजही करते सलाम, राष्ट्रीय बाल पुरस्काराने होणार गौरव

केंद्र सरकार सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी लढा देणाऱ्या हिमप्रियाच्या धैर्याला जग आजही करते सलाम, राष्ट्रीय बाल पुरस्काराने होणार गौरव
Himpriya
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 5:07 PM

दिल्लीः राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये बारा वर्षाच्या गुरूगु हिमप्रिया हिच्या नावाचाही समावेश आहे. 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिने आपल्या आई आणि लहान बहिणीला वाचवले होते. त्यावेळी ती अवघ्या आठ वर्षाची होती. तिच्या या धाडसासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी तिच्या वयाच्या आठव्या वर्षीच्या धैर्याला आजही सलाम करतात.

हिमप्रिया हवालदार असणारे वडील गुरूगु सत्यनारायण, आई पद्मावती आणि बहीण रिशिता आणि अवंतिका यांच्यासोबत ती जम्मू काश्मिरमधील सुंजवानमधील भारतीय सैन्य दलाच्या देखरेखीखाली असणाऱ्या वसाहतीत राहते. त्यावेळी 10 फेब्रुवारी 2018 मध्ये ज्यावेळी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी हिमप्रियाचे वडील उधमपूरमध्ये कार्यरत होते.

मायलेकींचे दहशतवाद्याबरोबर सुरू होते युद्ध

हिमप्रिया राहत असलेल्या ठिकाणी ज्यावेळी दहशतवादी घुसला त्यावेळी तिच्या आईने आपल्या तीन मुलींना बेडरुममध्ये बंद केले. यावेळी घरातील दरवाजाला जे जे साहित्य लावता येईल ते ते साहित्य दरवाजा उघडू नये म्हणून लावण्यात आले. यावेळी दहशतवादी हिमप्रियाच्या घरात घुसण्यासाठी सलग तीन तास त्यांच्या दरवाजावर धडका देत होता. त्याला त्यांच्या दरवाजा उघडता आला नाही पण त्यांच्या घरात हातबॉम्ब फेकल्यामुळ हिमप्रियाची आई पद्मावती जखमी झाली.

हातबॉम्बच्या हल्ल्यात आई होती जखमी

हातबॉम्बच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या आई आणि बहिणीसाठी हिमप्रिया दहशतवाद्यांबरोबर लढत राहिली. यानंतर समजलेल्या तिच्या धाडसाला अख्ख्या जगाने सलाम केला आहे. कारण घराबाहेर येऊन तिने दहशतवाद्याबरोबर संवाद सादत ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती.आणि तिच्या या प्रयत्नाला यश येऊन अखेर बेशुद्ध झालेल्या तिच्या आईला रुग्णलयात घेऊन जाण्यासाठी त्याला तयार केले. त्यानंतर एका सुरक्षित ठिकाणी गेल्यावर तिने भारतीय सैनिकांना सावध केले. त्यानंतर काही वेळेतच भारतीय सैनिकांनी त्या परिसरात घुसलेल्या दहशतवाद्यांना हटविण्यात आले. हिमप्रियाच्या प्रयत्नानंतरच त्या परिसरात दहशतवाद्यांचा वावर कमी झाला.

राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या सर्व विजेत्यांना राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये पथसंचलनामध्ये सहभागी होणार आहेत. याच वेळी त्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Why I killed Ganghi विरोधात काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली ही मागणी

Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

Nana Patole यांच्या वक्तव्याविरोधात Nagpurमध्ये भाजपाचं आंदोलन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.