हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी फार मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हार्दिकच्या वडिलांची इच्छा होती की, हार्दिकचं लग्न ‘उमिया …

हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी फार मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

हार्दिकच्या वडिलांची इच्छा होती की, हार्दिकचं लग्न ‘उमिया धाम’ येथे व्हावं. देवी उमियाने पाटीदारांच्या सत्तेच्या काळात हे मंदिर बनवलं होतं. मात्र, इथे हार्दिकचं लग्न होणं शक्य नाव्हतं, कारण उंझामध्ये हार्दिकला प्रवेशास कोर्टाने मनाई केली आहे, त्यामुळे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावातील हार्दिक पटेलच्या कुलदेवतेच्या मंदिरात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी हार्दिक आणि किंजलच्या जवळच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने या विवाहाला हजेरी लावली.

हार्दिकची पत्नी किंजल पटेल ही सुरत येथील आहे. हार्दिकपेक्षा किंजल दोन वर्षांनी लहान आहे. किंजल ही पारिख-पटेल समाजातील असून, तिने वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. किंजल सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे. हार्दिक आणि किंजल हे सहावी ते बारावी एकत्र शिकले आहेत. किंजल आणि हार्दिकची बहीण मोनिका यांच्यात चांगली मैत्री आहे, त्यामुळे तिचे आधीपासूनच हार्दिकच्या घरी येणं-जाणं होतं. हार्दिक आणि किंजल या दोघांचेही कुटुंब चंदननगरी या गावात राहात होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *