सद्गुरूनिर्मित ध्यान धारणा केल्यास मेंदू होतो तरुण; नव्या अभ्यासात नेमके काय समोर आले?

सध्या नुकतेच एक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात ईशा फाऊंडेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या ध्यान शिबिरांमुळ मेंदू आणखी तरुण होतो, असे समोर आले आहे.

सद्गुरूनिर्मित ध्यान धारणा केल्यास मेंदू होतो तरुण; नव्या अभ्यासात नेमके काय समोर आले?
sadhguru and isha foundation
| Updated on: May 21, 2025 | 9:08 PM

लोकांना त्यांच्या जीवनात आनंद शोधायला लावणारे अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव अर्थात सद्गुरु यांचे आजघडीला लाखो अनुयायी आहेत. त्यांचं फक्त भारतच नव्हे तर जगभरात आदबीने नाव घेतलं जातं. दरम्यान, याच सद्गुरु यांनी दिलेल्या ध्यान करण्याच्या पद्धतीमुळे मानवी मेंदूचे वृद्धत्व कमी होते. विशेष म्हणजे मानवी मेंदू आणखी तरूण होतो, असे समोर आले आहे.

इशा फाऊंडेशनच्या ध्यानधारणेवर मोठा अभ्यास

हार्वर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मॅसॅच्यूसेट्स जनरल हॉस्पिटल आणि बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटर यांनी एक अभ्यास केला आहे. या अभ्यासातून वर उल्लेख केलेला निष्कर्ष समोर आला आहे. हा अभ्यास करण्यासाठी वरील दोन्ही संस्थानी स्लीप बेस्ड ईसीजी स्कॅनची मदत घेतली. त्यातून प्रगत आणि उन्नत योगिक ध्यान केल्यामुळे मेंदूचे वृद्धत्त्व सरासरी 5.9 वर्षांनी कमी होते, असे स्पष्ट झाले.

सद्गुरू यांनी तयार केलेल्या तसेच इशा फाऊंडेशनच्या माध्यमातून ध्यानाचा अभ्यास केलेल्यांवर लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेली ध्यानधारणा केल्यास मेंदूचे वय हे कमी होते म्हणजेच मेंदू वृद्ध होण्याऐवजी तो आणखी तरुण होतो, असे या अभ्यासात समोर आले आहे.

मेंदू वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते

हा अभ्यास समोर आल्यानंतर सद्गुरू यांनीदेखील आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. व्यक्तीनिष्ठ विज्ञानाचा मानवी यंत्रणेवर होणारा परिणाम मोजण्यास सक्षम झाले असून ही आनंदाची बाब आहे. मानवी शरीराच्या यंत्रणेत उत्साह आणि चैतन्य निर्माण केल्यास वृद्धत्त्वाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे प्रत्येक मणूष्यप्रमाण्याने मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे जे यश मिळाले आहे त्याबद्दल आम्ही आमच्या लोकांचे, आमच्याबाजूला असणाऱ्या लोकांचे तसेच आगामी काळात येणाऱ्या ऋणी आहोत, असे सद्गुरू यांनी म्हटले आहे.

काय आहे संयम प्रोग्राम?

मानवी मेंदूच्या वृद्धत्त्वावर अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत ज्यांच्यावर अभ्यास करण्यात आला त्यांनी याआधी आमच्याकडील आठ दिवसांच्या Samyama program मध्ये भाग घेतला होता. या आठ दिवसांच्या ध्यानधारणेच्या शिबिरात सहभागी होण्याआधी साधकांवर एकूण 40 दिवस काम करण्यात आले होते. यामध्ये वेगन डायट तसेच शांभवी महामुद्रा क्रिया, शक्ती चालना क्रिया, योगासन, शून्य ध्यान आणि सुख क्रिया यासारख्या दैनंदिन योगिक पद्धतींचा समावेश होता. संयम साधनेच्या शिबिरात एकूण चार दिवस मौन वृत्त पाळले जाते. त्यासाठी समर्पित सराव आणि शिस्त फार महत्त्वाची आहे.