
सध्या ड्रेस कोडवरुन देशात वाद सुरु आहेत. शाळांतील गणवेशवरुन काही समुदायांनी आक्षेप घेतला आहे. काही मंदिरात स्वतंत्र ड्रेस कोड असतात. त्यावरुन अधूनमधून बातम्या येत असतात. आता एका ग्रामपंचायतीने पुरुषांना हाफपॅण्ट आणि बनियनमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करणारा ठराव पास केला आहे. जर गावातील तरुण जर हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिरताना दिसला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे या ग्रामपंचायतीने म्हटले आहे. अखेर या कठोर कारवाई मागे काय कारण आहे. याची तुम्हाला उत्सुकता असेल तर ते कारणही हटके आहे.
हरियाणातील भिवानी ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला आहे. त्यानूसार जर गावातील तरुण हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिरताना दिसले तर ग्रामपंचायत त्यांच्या दंडात्मक कारवाई करणार आहे. हा ठराव एका महिला सरपंचाने केला आहे. या गावातील महिला सरपंच रेणू यांचे सासरे सुरेश कुमार यांनी सांगितले की तरुण हाफपॅण्ट घालून गावात फिरत असतात. त्यामुळे गावातील भगिनींना आणि मुलींना अतिशय लाजीरवाने वाटते. त्यामुळे आपल्या सुनेने हा ठराव आणला होता. हा आदेश पाळला नाही तर अशा तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी बोलून त्यांना असे न करण्याबाबत समज दिली जाणार आहे. जर तरीही ते ऐकले नाही तर त्यावर ग्रामपंचायत स्वतंत्रपणे निर्णय घेईल असेही सुरेश यांनी सांगितले.
या गावातील संरपंचाचा आदेशाचे पालन होते की नाही याची तपासणी चौकीदारामार्फत केली जाणार आहे. या आदेशानंतर गुजरानी गावातील तरुणांना हाफ पॅण्टमध्ये फिरणे बंद केले आहे. घरात युवकांनी जशी मर्जी तसे रहावे परंतू दुसऱ्यांच्या घरी किंवा गल्लीत फिरताना त्यांना पूर्ण फुल पॅण्टमध्ये फिरावे लागेल. या आदेशानंतर दुसऱ्या ग्रामपंचायतीचे देखील त्यांना फोन येऊ लागले आहेत. त्या पंचायती देखील त्यांच्या गावात हा नियम लागू करु इच्छित आहेत असेही सुरेश कुमार यांनी सांगितले.
भिवानी गावची लोकसंख्या सात हजार आहे. या गावात 1250 घरे आहेत. गावात बॅंकेपासून शाळा देखील आहेत. याबद्दल या गावाच्या पोलिसांना काहीही माहीती नाही. पोलिसांनी जर ग्रामपंचायतीने बहुमताने हा ठराव मंजूर केला आहे तर त्यात पोलिस हस्तक्षेप करु शकत नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.