इथे भारताच्या 100 रुपयांच्या मोबदल्यात मिळतात 5 लाख, हजार रुपयांमध्ये फिरून याल संपूर्ण देश, काय आहे नाव?

जगात असे काही देश आहेत, ज्यांच्या चलनाची किंमत ही भारतीय रुपयांपेक्षा फार म्हणजे फारच कमी आहे. आज आपण अशाच एका देशातील चलनाबद्दल माहिती घेणार आहोत, जिथे तुम्हाला शंभर रुपयांच्या मोबदल्यात जळपास पाच लाख रुपये मिळू शकतात.

इथे भारताच्या 100 रुपयांच्या मोबदल्यात मिळतात 5 लाख, हजार रुपयांमध्ये फिरून याल संपूर्ण देश, काय आहे नाव?
money
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 10:23 PM

जगात काही देशांची करन्सी ही अतिशय मजबूत असते, तर काही देशांच्या करन्सीचं मूल्य हे तुलनेनं कमी असतं. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची करन्सी ही भारताचा रुपयापेक्षा खूप जास्त मजबूत आहे. तुम्ही जर या देशामध्ये जाऊन भारतीय रुपया एक्सचेंज कराल तर तुम्हाला लाखो रुपयांच्या बदल्यात फक्त काही हजार रुपयेच मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर आपण अमेरिकेच्या डॉलरचं देऊ शकतो. अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचं अधिकृत चलन आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत ते खूपच मजबूत आहे. सध्या 95.12 रुपये प्रति डॉलर असा विनिमय दर सुरू आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही 95.12 रुपये देता, तेव्हा तुम्हाला त्याबदल्यात एक डॉलर मिळू शकतो.

मात्र जगात असे देखील काही देश आहेत, ज्या देशांच्या चलनाचं मूल्य हे भारतापेक्षा खूप कमी आहे. अशा देशामध्ये तुम्ही जेव्हा फिरण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्वस्त मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे सर्व गोष्टी स्वस्त मिळतील कारण नेपाळच्या चलनाचं मूल्य हे भारताच्या रुपयापेक्षा कमी आहे. सर्वसाधारणपणे भारताच्या एका रुपयाच्या बदल्यात नेपाळचे तुम्हाला सात ते आठ रुपये मिळू शकतात. म्हणजे भारताचे दहा रुपये हे नेपाळमध्ये 70 ते 80 रुपये होतात. त्यामुळेच आपल्याला नेपाळमध्ये भारताच्या तुलनेत अनेक गोष्टी स्वस्त वाटतात.

Loading...

आज आपण जगातील सर्वात स्वस्त चलनाबद्दल जाणून घेणार आहोत, ते आहे इराणचं चलन. रियाल हे इराणचं अधिकृत चलन आहे. मात्र सध्या जागतिक बाजारामध्ये इराणी रियालचं मूल्य हे प्रचंड प्रमाणात घसरलं आहे. सध्याच्या दरानुसार तुम्हाला जर भारतीय रुपया इराणमध्ये रियालच्या मोबदल्यात एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला तिथे एक रुपयाच्या मोबदल्यात 490 ते 500 रुपये मिळतात. याचाच अर्थ जर तुमच्याकडे शंभर भारतीय रुपये असतील तर त्याची किंमत इराणमध्ये जवळपास 5 लाखांच्या आसपास होते. इराण हा सुंदर देश आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या देशाला भेट देत असतात, मात्र अलीकडच्या काळात अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us