AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला मोठा झटका, इंडिया आघाडीला मिळणार नवा भिडू? माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आज अनेक राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. एकीकडे ही मतमोजणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

भाजपला मोठा झटका, इंडिया आघाडीला मिळणार नवा भिडू? माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
भाजपला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 10:18 PM
Share

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे (YSRCP) प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याकडून आता इंडिया आघाडीसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही? हे अजून तरी निश्चित नाही, मात्र त्यांनी दिलेल्या संकेतानंतर ते आता लवकरच इंडिया आघाडीमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र आता हे तर नक्की झालं आहे, की ते इथून पुढे भाजपाचं समर्थन करणार नाहीयेत. जगन मोहन रेड्डी यांनी यापूर्वी संसदेमध्ये अनेक बील पास करण्यासाठी भाजपची मदत केली आहे. मात्र आता आपल्याला आपल्या जुन्या निर्णयांवर पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, ती माझी मोठी चूक होती असं देखील ते म्हणाले आहेत.

जगन मोहन रेड्डी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त निवडीसंदर्भात 2023 मध्ये भाजपने जे बील आणलं होतं, त्याला देखील त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता आपल्या या चुकीवर मला पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही संपूर्ण प्रक्रियाच दोषपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मला त्यावेळी भाजपला समर्थन दिलं याचा पश्चाताप होत आहे, ज्यापद्धतीने आज जे काही सुरू आहे, ते चुकीचं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त किंवा राज्याचे निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती सत्तेत असलेल्या पक्षांद्वारे केली गेली नाही पाहिजे. या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असायला हवा, त्यांनी या प्रक्रियेमध्ये आपलं मत दिलं पाहिजे, असं देखील यावेळी रेड्डी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जगन मोहन रेड्डी यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ते लवकरच इंडिया आघाडीसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, मात्र दुसरीकडे असा देखील अंदाज बांधला जात आहे की, ते तटस्थ राहून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. मात्र याबाबत अजूनही त्यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...