…म्हणून हिंदूची लोकसंख्या कमी होतेय; साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा काय तरी वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Oct 20, 2022 | 10:08 PM

हिंदूंकडून कमी मुले जन्माला घातली जात असल्यानेच हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

...म्हणून हिंदूची लोकसंख्या कमी होतेय; साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा काय तरी वादग्रस्त वक्तव्य
Follow us on

भोपाळः मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) मध्ये खासदार (MP) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) या आपल्या वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुले पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी हिंदूंची लोकसंख्या कमी असल्याचा दावा केला आहे.याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंदूंकडून कमी मुले जन्माला घातली जात असल्यानेच हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

याशिवाय त्यामागचे मोठे कारण देत त्यांनी मोठ्या संख्येने हिंदू मुलींचे धर्मांतर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे याचाही गांभीर्याने विचार करावा लागेल असंही त्यांनी वक्तव्य केले आहे.

भोपाळमध्ये गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बोलत होत्या. यावेळी त्यांनी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या लोकसंख्येचे असंतुलन यावर त्यांना केलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, हिंदू कमी मुले जन्माला घालत आहेत.

त्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. याशिवाय हिंदू मुलींना लव्ह जिहादमध्हीये अडकवून मुस्लिम बनवले जात असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले आहे.

लव्ह जिहादमध्ये अडकवून हिंदू मुलींना दुसऱ्या धर्मात घेऊन जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. देशातील लोकसंख्येच्या विस्फोटामागे एक ठराविक वर्ग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

त्यांच्यासाठी लोकसंख्येचे कोणतेही नियम नाहीत, त्यामुळे पाहिजे तितकी मुले तयार करा अशी पद्धतही त्या वर्गात असल्याचे सांगत. हिंदूं धर्मातच असे नाही, त्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

याआधी प्रयागराज येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रेय होसाबळे यांनी धर्मांतरामुळे देशातील हिंदूंची संख्या कमी होत असल्याचे म्हटले होते.

देशाच्या अनेक भागात धर्मांतराचे षडयंत्र सुरू आहे. काही सीमावर्ती भागातही घुसखोरी होत आहे. तसेच लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये फाळणीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.