
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या मोंथा चक्रीवादळाने आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला मोठा फटका देत नासधूस केली. त्याचा परिणाम ओदिशा, तेलंगणा, छत्तीसगड पासून उत्तर प्रदेश ते बिहारपर्यंत जाणवला. या चक्रीवादळाचा वेग 110 किलोमीटर प्रति तास इतका पोहचला होता. मेलिसा चक्रीवादळाने देखील जमैकात जबरदस्त नुकसान पोहचवले आणि नंतर ते क्युबात पोहचले. या वादळाला आतापर्यंतच्या शक्तीशाली श्रेणीच्या 5 वादळापैकी एक मानले जात आहे. या वादळाचा वेग एका समयी 185 मैल प्रति तास वेगाने पोहचला होता. अखेर कोणतेही वादळ इतके ताकदवान कसे होते? जेव्हा हे वादळ तयार झाले तेव्हा इतके ताकदवान नव्हते मग अचानक यात ताकद कुठून येते त्यांच्या मार्गातील कोणत्याही वस्तू, इमारती, झाडे काहीही टीकत नाही…चला पाहूयात. अखेर वादळ कसे तयार होते आणि ताकदवान बनते.. प्रत्येक मोठे वादळ मग ते हुरिकेन असो की टायफून ही सर्व वादळे जेव्हा समुद्रात बनतात तेव्हा यांचा वेग 15-20 किलोमीटरच्या आसपास असतो....