D-Mart ला एवढ्या स्वस्तात वस्तू विकूनही कसं परवडतं? या दोन गोष्टी प्रत्येकाला माहीत पाहिजेच, परत तुम्ही कधीच…
डी मार्ट (D-Mart ) हे आजकाल जवळपास सर्वांच्याच खरेदीचं हक्काचं ठिकाण बनलं आहे. एकतर एकाच छताखाली तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात, आणि दुसरं म्हणजे वस्तूंच्या किमतीवर भरघोस सूट दिली जाते, परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? डी मार्ट मध्ये एवढं स्वस्त सामान कसं मिळतं?

डी मार्टची सुरुवात 2002 मध्ये झाली होती. जेव्हा डी मार्ट शॉपचं पहिलं दुकान सुरू झालं तेव्हा कोणी हा विचार देखील केला नव्हता की भविष्यात डी मार्टला ग्राहकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल. आज संपूर्ण देशभरात डी मार्टचे तब्बल 514 दुकानं आहेत. तुम्ही डी मार्टमध्ये कधीही आणि कोणत्याही वेळेला जा तुम्हाला तिथे कायम गर्दी दिसते. सुट्टीच्या दिवशी विशेष: शनिवारी आणि रविवारी तर डी मार्टमध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहक या ठिकाणी गर्दी करतात. डी मार्टचं वैशिष्ट म्हणजे एक तर तुम्हाला एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे विक्रीसाठी जेवढ्या काही वस्तू ठेवलेल्या असतात, त्या वस्तूंवर भरघोस सूट देण्यात येते. त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात.
परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की डी मार्टमध्ये ज्या वस्तू मिळतात, त्या एवढ्या स्वस्त कशा असतात? तसेच या वस्तूंवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट देऊन देखील डी-मार्टला नफा कसा होता? बरोबर आजपासून 25 वर्षांपूर्वी डी मार्टचे मालक राधाकृष्ण दमानी यांनी या नफ्याचे गणित बसवले होते. त्यांनी डी मार्टचं पहिलं दुकान सुरू करताना फक्त दोनच गोष्टी केल्या, त्यामुळे आजही आपल्या ग्राहकांना एवढं स्वस्त सामान विकूनही डी मार्टला चांगला नफा होतो.
त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर ती म्हणजे जिथे दुकानं सुरू करायचं आहे, ती जागा थेट विकतच घेऊन टाकली. त्यामुळे रेंटच्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत झाली. दुसरीकडे गोष्ट म्हणजे तुम्ही देशातील कोणत्याही डी मार्ट स्टोअरला भेट द्या तिथे तुम्हाला फक्त दोनच रंग दिसतील एक म्हणजे पिवळा आणि दुसरा हिरवा याचाच अर्थ त्यांनी स्टोअरच्या सजावटीमध्ये देखील मोठी बचत केली. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी मार्ट बाजारत येण्यापूर्वी जे मोठे शॉप होते, ते जेव्हा कोणतंही सामान मुळ उत्पादकांकडून खरेदी करायचे तेव्हा त्याचं बील हे तीस ते चाळीस दिवसांनी मुळ उत्पादकाला द्यायचे. परंतु डी मार्टने ही पद्धत मोडीत काढली, डी मार्टने मुळ उत्पादकांना रोख पैसे देण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्या मनात डी मार्टबद्दल विश्वास निर्माण झाला, त्यामुळे ते देखील डी मार्टला अधिक स्वस्त दरात माल उपलब्ध करून देऊ लागले. ज्या ग्राहकांना आता ही गोष्ट माहीत झाली आहे, त्यांच्या मनात आता पुन्हा कधीच असा प्रश्न येणार नाही की, डी मार्टला नेमका नफा होतो तरी कसा?