AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचं नेमकं किती नुकसान, पहिल्यांदाच हादरवणारा आकडा समोर, ट्रम्प यांची झोप उडाली

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये तब्बल 39 दिवस युद्ध सुरू होते, या युद्धात अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचं या युद्धात नेमकं किती नुकसान झालं आहे? याचा आकडा आता समोर आला आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचं नेमकं किती नुकसान, पहिल्यांदाच हादरवणारा आकडा समोर, ट्रम्प यांची झोप उडाली
US Iran WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 6:04 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये 39 दिवस भीषण युद्ध सुरू होतं. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील या काळात आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला घाम फोडला. इराणने इस्त्रायलच्या अनेक भागांमध्ये मिसाईल हल्ले केले, यामुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला, इस्त्रायलसोबतच इराणकडून अमेरिकेच्या अनेक सौन्य तळांवर तसेच युद्धनौकांवर देखील हल्ले करण्यात आले. अमेरिकेची अनेक विमानं देखील इराणने पाडली आहेत. या युद्धात अमेरिकेनं पाण्यासारखा पैसा खर्च केला, अखेर 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. दरम्यान या 39 दिवसांमध्ये अमेरिकेचं नेमकं किती नुकसान झालं याचा हादरवणारा आकडाच आता समोर आला आहे.

एका रिपोर्टनुसार या युद्धामध्ये अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. 39 दिवस सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेचे जवळपास 39 विमानं पूर्णपणे नष्ट झाले आहेत. तर 10 विमानांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झालं आहे. अमेरिकेनं युद्धाच्या काळात शॉर्टीज म्हणजे आपल्या मिशनासाठी तब्बल 13,000 वेळा उड्डाण केलं. यावर देखील अमेरिकेने मोठ्या प्रमाण पैसा खर्च केला आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सौनिक मारले गेले आहेत.

या युद्धात अमेरिकेला सर्वात मोठा धक्का हा ड्रोनच्या आघाडीवर झाला आहे. अमेरिकेचं या युद्धात जेवढं नुकसान झालं आहे, त्यामध्ये 60 टक्के नुकसान हे फक्त ड्रोनशी संबंधित आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या युद्धात अमेरिकेचे जवळपास 24 MQ-9A रीपर ड्रोन नष्ट झाले आहेत. अमेरिकेचं नुकसान एवढ्यावरच थांबलं नाही, तर युद्धविरामानंतर देखील अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजवर घिरट्या घालणारं अमेरिकेचं MQ-4C- ट्राइटन ड्रोन अचानक गायब झालं आहे, या ड्रोनची किंमत तब्बल 200 मिलियन डॉलर एवढी आहे.

5 फायटर जेट देखील पाडले

दरम्यान ड्रोनच नाही तर या युद्धात इराणने अमेरिकेचे 5 फायटर जेट देखील पाडले आहेत. ज्यामध्ये चार F-15E स्ट्राइक ईगल फायटर जेटचा समावेश होता, तर एक A-10 वॉर्थोग फायटर जेटचा समावेश आहे. धक्कादायक माहिती म्हणजे अमेरिकेचं जेवढं नुकसान झालं आहे, त्यातील वीस टक्के नुकसान हे ‘फ्रेंडली फायर’ म्हणजेच स्वत:च्या चुकांमुळेच झालं आहे.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी