
मणिपूरमधील हिंसाचाराला आता जवळपास दीड वर्षे झाली आहेत. मात्र त्या राज्यातील वातावरण हे अजुनही निवळलेलं नाही. त्यावेळी झालेल्या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन महिलांना नग्न अवस्थेत नेलं जात असतानाच्या व्हिडीओने देशभरात खळबळ उडाली होती. या व्हिडीओचे संसदेतही पडसाद दिसलेले, कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आरोपींना सोडणार नसल्याचं सांगितलेलं. मात्र हे सर्व कशासाठी? अचानक मणिपूरमध्ये असं काय घडलं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंसा का आणि कशासाठी होतेय ते जाणून घ्या. मणिपूरमधील भौगोलिक स्थिती मणिपूरमधील भौगोलिक स्थिती समजून घ्या, मणिपूरची राजधानी इम्फाळ असून क्षेत्रफळाच्या 10 टक्के आहे. राज्यातील जवळपास 57 टक्के लोकसंख्या या भागात वास्तव्यास आहे. उर्वरित 90 टक्के भाग हा डोंगराळ प्रदेशात आहे. त्यामध्ये 43 टक्के लोक राहतात. राजधानी इम्फाळमध्ये मैतेई समाजाचे लोकं राहतात जे हिंदू आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे...