AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना कसं फसवायचा? सहलीच्या नावाखाली… दिल्लीच्या कॉलेज कांडची इनसाईड स्टोरी!

सध्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालकांचा धक्कादायक कांड समोर आला आहे. या संचालकाला स्वामीजी म्हटले जाते. आता हे स्वामीजी फरार असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे.

स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना कसं फसवायचा? सहलीच्या नावाखाली... दिल्लीच्या कॉलेज कांडची इनसाईड स्टोरी!
delhi chaitanyananda assault
| Updated on: Sep 25, 2025 | 9:56 AM
Share

Swami Chaitanyananda Scam : राजधानी दिल्लीतील वसंतकुंज या भागात असलेल्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे कॉलेज सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या संस्थेचे संचालक चैतन्यानंद स्वामी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कॉलेजमध्ये चैतन्यानंद स्वामी यांना आदराने स्वामीजी म्हटले जाते. याच स्वामीजींचा आका अजब कारनामा समोर आला आहे. या स्वामीजींविरोधात श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एकूण 17 विद्यार्थिंनींनी लैंगिक शोषण आणि छेडछाडीचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याधीच स्वामीजी फरार झाले आहेत. पोलिस या फरार स्वामींचा शोध घेत आहेत. दरम्यान, हे स्वामी विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात कसे ओढायचे? मोफत शिक्षण, स्कॉलरशीप परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थिंनींना कसे फसवले जायचे? याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

महाविद्यालयात कोणते शिक्षण दिले जायचे

श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतर्फे मुलींना मोफत प्रवेश दिला जायचा. मात्र मोफत प्रवेश दिला जात असला तरी नंतर मात्र विद्यार्थिंनींकडून पैसे वसूल केले जायचे. पुढे ट्रिपरच्या नावाखाली हे स्वामीजी मुंलीचे शोषण करायचे. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे कॉलेज श्रृंगेरी मठातर्फे चालवले जाते. या संस्थेला वसंतकुंज औद्योगिक क्षेत्रात मोफत जमीन देण्यात आलेली आहे. या संस्थेची स्थापना 1996 साली करण्यात आली. या संस्थेअंतर्गत देशात इतरही भागात महाविद्यालये चालवली जातात. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बिझनेस स्टडीजमध्ये फक्त पदव्युत्तर पदविकेचे सिक्षण दिले जाते. AICTE ने याला मान्यता दिलेली आहे. या अभ्यासक्रमासाठी 2023 साली श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एकूण 17 मुली आणि 2 मुलांनी प्रवेश घेतला होता. 2024 साली 20 मुलींनी प्रवेश घेतला होता. या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

मोफत शिक्षणाची ऑफर नंतर…

या कॉलेजच्या संचालक संस्थेने ऑगस्ट महिन्यातच स्वामीजींनी पदावरून हटवले होते. विद्यार्थ्यांनी श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी वेगवेगळी प्रलोभनं दिली जात. अगोदर देशपातळीवर एक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जायची. ही परीक्षा ऑनलाईन व्हायची. मुलाखतही ऑनलाईन व्हायची. त्यानंतर आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थिंना कॉलेजमध्ये मोफत प्रवेश दिला जायचा. विद्यार्थींनी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केल्यावर नंतर मात्र वेगवेगळ्या माध्यमातून फी वसूल केली जायची. हे कॉलेज देगण्यांवरच चालते असे सांगत विद्यार्थिनींच्या पालकांकडून 60 हजार ते 1 लाख रुपये वसूल केले जायचे.

विद्यार्थिनींना जाळ्यात कसे अडकवले जायचे?

श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालकपदी असताना हे स्वामीजी विद्यार्थिंना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात अडकवायचे. हे स्वामीजी अनेक विद्यार्थिनींना अश्लील मेसेजेस पाठवायचे. तसेच काही मुलींना स्वामीजींकडी भेटवस्तूही दिल्या जायच्या. एकदा मनात बसलेल्या विद्यार्थिनीला ते कोणतेही कारण नसताना बाहेर फिरायला घेऊन जायचे. आवडलेल्या मुलीला फिरायला घेऊन जाण्यासाठी ते कॉलेजची सहल काढायचे. या सहलीत नावाला म्हणून अन्य विद्यार्थिनींचाही समावेश केला जायचे. शिक्षकांकडे याबाबत तक्रार करताच स्वामीजींचा आदेश आहे असे सांगून शिक्षक विद्यार्थिनींना शांत राहण्यास सांगायचे. अशा प्रकारे हे स्वामीजी विद्यार्थिनींना फसवायचे. सध्या या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्वामीजी सध्यातरी फरार असून त्यांचाही शोध घेतला जातो आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.