नकळत ही चूक झाली की साप घरात आलाच, कधीच नका करू या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष!

साप हा असा प्राणी आहे, जो कोणताही आवाज न करता तुमच्या घरात शिरतो. सापला अडचण आवडतो. जिथे अडचण, अडगळ तिथे साप हमखास असतोच. हिरवळ, दाट झाडी, जंगलातही साप सापडतात.

नकळत ही चूक झाली की साप घरात आलाच, कधीच नका करू या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष!
how to remove snake from home
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 8:56 PM

Snake Remedy :  प्रत्येकाला आपलं घर ऐसपैस असावं असं वाटतं. छानसं घर आणि त्या घरापुढे छोटीशी बाग, हे तर प्रत्येकाचंच स्वप्न असतं. घरापुढे बाग लावण्यासाठी अनेकजण बरीच मेहनत घेतात. अनेकांना या मेहनतीचं फळ मिळतं. पुढच्या काही महिन्यात, वर्षभरात झाडं मोठी होतात. बगीचा फुलतो. परंतु घरापुढे बहरलेला हा बगीचाच नंतर तुमची डोकेदुखी वाढवू शकतो. याच बगीच्यामुळे तुमच्या घरातील एखादा सदस्य संकटात सापडू शकतो. हे कसं होऊ शकतं ते समजून घेऊ.

साप हा असा प्राणी आहे, जो कोणताही आवाज न करता तुमच्या घरात शिरतो. सापला अडचण आवडतो. जिथे अडचण, अडगळ तिथे साप हमखास असतोच. हिरवळ, दाट झाडी, जंगलातही साप सापडतात. म्हणूनच तुमच्या घरापुढे बाग असेल, बागेत झाडं असतील, हिरवळ असेल तर साप या बागेत येऊ शकतो. वास्तव्य करण्यासाठी बाग हे सापाचे आवडीचे ठिकाण आहे.

Loading...

तुमची ही एक चूक ठरू शकते घातक

घरापुढची बाग चांगली वाढावी यासाठी आपण लावलेल्या झाडांना भरभरून पाणी देतो. गवताला, फुलझाडांना, छोट्या रोपट्यांना जास्त पाणी दिलं की ते लवकर वाढतील, अशी आपली धारणा असते. ते काही अंशी खरंदेखील आहे. झाडांना वाढण्यासाठी पाण्याची घरज असते. परंतु बागेत प्रमाणापेक्षा पाणी देत राहिलं तर जमिनीमधील गारवा वाढतो. सापाला गारवा आवडतो. जिथं थंड जागा दिसेल तिथे साप वास्तव्य करतो. म्हणूनच तुम्ही बागेला जास्त पाणी दिलं तर गारव्यामुळे साप तिथे राहायला येऊ शकतो. म्हणूनच झाडांना आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. यामुळे तुमच्या बागेत नको असणारे पाणी, येण्याची शक्यता कमी होते.

सापांना गारवा आवडतो त्यामुळे घरातील इतरही गारव्याच्या ठिकाणी साप आपले वास्तव्य करू शकतात. त्यामुळे घरातील गारव्याचे ठिकाण ओळखून साप तिथे येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झाडांची कुंडी, झाडांचे खोड, गवत, पालापाचोळा अशा ठिकाणीही साप राहतात. त्यामुळे बागेत नियमित सफाई करावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us