AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमीन विकली, वॉचमन झालो, आज सगळं बदललं; मित्रांचं नाव घेत अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली मनातली सल

बॉलिवूड, साऊथ आणि मराठी सिनेमा क्षेत्र गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे हे आज कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात आयोजित सभेमध्ये बोलत होते. त्यांनी यावेळी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. काय म्हणाले नेमकं? जाणून घेऊयात....

जमीन विकली, वॉचमन झालो, आज सगळं बदललं; मित्रांचं नाव घेत अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली मनातली सल
Sayaji Shinde NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 8:45 PM
Share

सह्याद्री देवराईमुळे नेहमी चर्चेत असणारे आणि आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते सयाजी शिंदे हे कर्जत वृक्षतोडीवरुन सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. आज त्यांनी कर्जतमधील वृक्षतोड झालेल्या परिसरात पाहणी केली. पाहिलेलं दृश्य पाहून त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी आयोजित केलेल्या सभेमधून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले सयाजी शिंदे?

विवेकानंद म्हणाला की महाराष्ट्रमध्ये अशी भूमिका घेणारी माणसं दिसत नाही. खूप जण विकली गेली आहेत बाजार मोठा दिसतोय. आमदार खासदार येत नसेल तर मयताला देखील जाऊ नका. एवढे वृक्षतोड झाले त्याची शोकसभा सुरू आहे, हा जाब त्यांना विचारा. चाळीस वर्षानंतर येणे तर जागा मिळाली. राजकारणात पैसे देऊन माणसं बोलवली जातात. पण झाडासाठी एवढी जनता जमा झाली. दलाल लोकांना थारा देऊ नका, तुम्ही सावध राहा.

हा प्रकल्प होऊ देणार नाही

आपलं 70 टक्के जंगल होतं. जगातला श्रीमंत देश आपला होता. या सर्वांनी लुटून खाल्ला. पच्चीस टक्के तरी जंगल असलं पाहिजे, ते देखील 18 16 वर आणले. आधी 90 हजार झाडे लावा, त्यांना जगू द्या. मग टोरेंटला मंजुरी द्या. झाडं तोडून परमिशन दिलीच पाहिजे नव्हती. 88 साली मी कॉलेजला होतो. आमची जमीन गेली त्यावेळी आम्हाला कळलं नाही. 14 हजार रुपये दिले. मी वॉचमेन म्हणून काम करत होतो. आमची जमीन गेली म्हणून आम्हाला वॉचमनच्या नोकऱ्या दिल्या. मला कलाकार बनायचं होतं, मी झालो. पण माझ्यासोबत असणारे मित्र आता रिटायर झाले, भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

पाच दहा एकर जमिनी गेल्या. मला चाळीस वर्षानंतर एक एकर जागा मिळाली. चाळीस वर्ष भांडणात एक पिढी जाते. ज्या ठिकाणी मला जागा दिली त्या ठिकाणी अतिक्रमण झालं. सरकारचे धोरण हे अतिक्रमणाला हटवायचे नाही. त्यामुळे तुम्ही बाजूला होऊन जागा घ्या. असं का तर त्यांच्या मतांचा प्रॉब्लेम आहे, असंही यावेळी शिंदे म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?