AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलजीत दोसांझच्या इंदूर कॉन्सर्टमध्ये या 5 गाण्यांवर बंदी? प्रशासनाचा आयोजकांना इशारा, नेमकं कारण काय?

दिलजीत दोसांझच्या इंदूरमधील कॉन्सर्टच्या कार्यक्रमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या या 5 गाण्यावर बंदी घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. नेमकं हरियाणा हायकोर्टाने काय म्हटलं?

दिलजीत दोसांझच्या इंदूर कॉन्सर्टमध्ये या 5 गाण्यांवर बंदी? प्रशासनाचा आयोजकांना इशारा, नेमकं कारण काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 07, 2026 | 8:26 PM
Share

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या आपल्या ‘ऑरो टूर’मुळे चर्चेत आहे. या टूरची सुरुवात 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीमधून झाली. आता 15 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच प्रशासनाने काही गाण्यांबाबत आक्षेप घेतला आहे. ड्रग्ज, नशा आणि शस्त्रांचे उदात्तीकरण करणारी पाच गाणी कॉन्सर्टमध्ये सादर करू नयेत, अशी सूचना आयोजकांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील कॉन्सर्टसंदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी 21 मॉलच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात दिलजीत दोसांझने कार्यक्रमादरम्यान काही विशिष्ट गाणी सादर करू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यामध्ये ‘जट उठे फायर करदा’, ‘पटियाला पेग’, ‘जीभ विच लंबिया’ यांसह एकूण पाच गाण्यांचा उल्लेख आहे. या गाण्यांमधून नशा आणि शस्त्रांचे उदात्तीकरण होत असल्याने त्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

पंजाब-हरियाणा हायकोर्टाच्या निर्देशांचा हवाला

या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या निर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ड्रग्ज, नशेचे सेवन आणि शस्त्रांचे महिमामंडन करणाऱ्या गाण्यांबाबत न्यायालयाने व्यक्त केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर इंदूर प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश राय यांनी कॉन्सर्ट आयोजकांना पत्र पाठवून संबंधित निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. हे पत्र सुमारे 5 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आल्याची माहिती आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा

कॉन्सर्टदरम्यान आक्षेपार्ह गाणी सादर झाल्यास कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिलजीतच्या इंदूर कॉन्सर्टवर प्रशासनाची विशेष नजर असणार आहे.

कॉन्सर्ट रद्द होणार नसल्याचे दिलजीतने केले स्पष्ट

दरम्यान, इंदूरमधील हा कार्यक्रम रद्द झाल्याच्या बातम्या यापूर्वी समोर आल्या होत्या. मात्र, दिलजीत दोसांझने स्वतः कॉन्सर्ट रद्द केला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता कार्यक्रमातील गाण्यांच्या निवडीवरून चर्चा सुरू झाली आहे. दिलजीतच्या चाहत्यांना 15 नोव्हेंबरच्या कॉन्सर्टमध्ये कोणती गाणी ऐकायला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?