Girish Mahajan : …तर शेतकऱ्यांनो सरकारचे 5000 रुपये परत करा, गिरीश महाजनांच्या विधानाची चर्चा, काय आवाहन केलं?
भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महजान यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. ज्या शेतकऱ्यांना या पैशांची गरज नसेल, त्या शेतकऱ्यांनी 5000 रुपये सरकारला परत करावेत, असं महाजन म्हणालेत. त्यांच्या या विधानाने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Girish Mahajan : सध्या राज्यात दुष्काळ पडलाय. राज्यातील 304 तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतंय. दिवाळी चांगली जावी यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5000 रुपयांची अग्रीम रक्कम जमा केलेली आहे. आता याच रकमेवरून भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महजान यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. ज्या शेतकऱ्यांना या पैशांची गरज नसेल, त्या शेतकऱ्यांनी हे पैसे सरकारला परत करावेत, असं महाजन म्हणालेत. त्यांच्या या विधानाने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
गिरीश महाजन आज (7 नोव्हेंबर) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील विधान केले. “पाच-पाच हजार रुपये सरकारने सर्वच शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. पण अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. माझ्याकडे सकाळासून 50 शेतकरी आले. माझ्याही खात्यात सरकारने पाठवलेले पैसे आलेले आहेत, पण मला हे पैसे परत करायचे आहेत, असं या शेतकऱ्यांचं मत आहे. मला या पैशांची आवश्यकता नाही. माझा शेतीपुरक व्यवसाय आहे, असं या शेतकऱ्यांचं मत आहे,” असं महाजन म्हणाले. तसेच ज्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांची गरज नसेल त्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.
पैशांची गरज नसलेल्या शेतकऱ्यांनी….
विशेष म्हणजे मी स्वत:देखील हे पैसे सरकारला परत करणार आहे, असं त्यांनी जाहीर केलंय. सध्या सेतकरी संकटात सापडलाय. आर्थिक पातळीवर त्याच्यावर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. अग्रीम 5000 रुपयांची शेतकऱ्यांना थोडीफार मदत होत आहे. अजूनही दुष्काळाची मुख्य मदत मिळालेली नाही. असे असताना गिरीश महाजन यांनी पैशांची गरज नसलेल्या शेतकऱ्यांना 5000 रुपये परत करा, असे आवाहन केलेय. त्यामुळे या आवाहनाला किती प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाजनांच्या या आवाहनानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
