Chanakya Niti : आदर्श कुटुंब प्रमुख कोणाला म्हणावं? चाणक्य यांनी सांगितली लक्षणं
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आदर्श कुटुंब प्रमुखाची काही लक्षणं सांगितली आहेत, चाणक्य म्हणतात हे गुण जर एखाद्या माणसामध्ये असतील तर त्याला आदर्श कुटुंब प्रमुख म्हणावं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब प्रमुखाची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात फक्त कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी घेणं म्हणजे आदर्श कुटुंब प्रमुख होणं नाही. कुटुंब प्रमुखाकडे काही खास गोष्टींची आवश्यकता असते, जर या गोष्टी कुटुंबप्रमुखाकडे असतील तर तो आदर्श कुटुंब प्रमुख ठरतो. आपल्या कुटुंबाची फार मोठी जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. ज्या कुटुंबाचा प्रमुख हा अधिक समजदार, ताकदवान, धनवान असतो, सर्वगुण संपन्न असतो, ते कुटुंब अधिक सुखी असतं. कुटुंब प्रमुखाकडे काही गुण हे असणं गरजेचंच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
धन – चाणक्य म्हणतात कुटुंबाचा प्रमुख असतो, त्याच्याकडे पैसा हा हवाच, कारण कधी कोणता प्रसंग कसा येईल हे काही सांगता येत नाही. वाईट काळात आपल्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत, यासाठी कुटुंब प्रमुखाने काही पैशांची बचत ही आवश्य केलीच पाहिजे. वाईट काळात हाच पैसा कुटुंबाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे जो मनुष्य वाईट काळासाठी पैशांची बचत करतो, त्याला आदर्श कुटुंबप्रमुख म्हणावं असं चाणक्य म्हणतात.
शिस्त – चाणक्य म्हणतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. कुटुंब प्रमुखाकडे शिस्त ही असलीच पाहिजे. तरच त्याला आदर्श कुटुंब प्रमुख म्हणावं, जर कुटुंब प्रमुखाकडेच शिस्त नसेल तर तो आपल्या कुटुंबावर काय चांगले संस्कार करणार? त्यांना शिस्तीचं महत्त्व कसं पटून देणार? त्यामुळे कुटुंब प्रमुखाकडे शिस्त ही असलीच पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संयम – चाणक्य म्हणतात आदर्श कुटुंब प्रमुखाकडे असलेला हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. ज्याच्याकडे संयम आहे, तो आदर्श कुटुंब प्रमुख होऊ शकतो. कारण प्रत्येक परिस्थिती ही सारखी नसतेच जो वाईट परिस्थितीमध्ये संयम ठेवतो, तोच खरा आदर्श कुटुंब प्रमुख, त्यामुळे कुटुंब प्रमुखाने संयम ठेवायला शिकलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
