अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट

हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्वीनीच्या गूढ मृत्यूने खळबळ उडवली आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटलेल्या या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. CCTV फुटेजमध्ये तेजस्वीनी नग्नावस्थेत मंदिरात प्रवेश करून मूर्ती घेऊन तलावाकडे जाताना दिसत आहे. पोलिसांनी मूर्तीचा शोध सुरू केला असून, तिच्या एक लाखांहून अधिक भाड्याच्या फ्लॅट आणि संशयास्पद परिसराची कसून चौकशी करत आहेत.

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली... त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Tejaswini software engineer
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 19, 2026 | 1:23 PM

हैदराबादमध्ये राहणारी सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्वीनीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पीरजादीगुडा तलावात सापडला होता. सुरुवातीला तेजस्वीनीने आत्महत्या केल्याचं वाटत होतं. पण आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मंदिरातील एका सीसीटीव्ही फुटेजने सर्वांचीच झोप उडवली आहे. तेजस्वीनी नग्नावस्थेत एका मंदिरात जाताना दिसत आहे. मंदिरातून मूर्ती घेऊन तिने तलावात उडी मारल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आता या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. कोणत्या कारणामुळे तेजस्वीनीने हे टोकाचं पाऊल उचललं? याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सुरुवातीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेजस्वीनी रात्रीच्यावेळी निर्वस्त्र होऊन मंदिरात गेली. मंदिरातून तिने अण्मावारू यांची मूर्ती उचलली. त्यानंतर ती तलावाच्या दिशेने गेली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेजस्वीनी मूर्ती घेऊन तलावाकडे गेली आणि तिने उडी मारून आत्महत्या केली. तेजस्वीनी नग्नावस्थेत मंदिरात जाताना दिसत आहे. मंदिरात जाऊन मूर्ती घेताना दिसत आहे. तलावाच्या दिशेने जातानाही दिसत आहे. पण मूर्ती घेऊन तिने तलावात उडी मारल्याचा सीसीटीव्ही फुटेज नाहीये. त्यामुळे मूर्ती कुठे गेली? असा सवाल केला जदात आहे.

3500 रुपये भाडं

पोलीस आता तलावात मूर्तीचा शोध घेत आहे. मूर्ती मिळाली तर या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तेजस्वीनी ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती, त्याचं रोजचं 3500 रुपये भाडं ती भरत होती. हिशोब केला तर ती एक लाखाहून अधिक रक्कम रूमच्या भाड्यासाठी देत होती. ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती, त्याच्या वरच्या दोन मजल्यावर लॉज होता. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं येणंजाणं सुरू होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अपार्टमेंटची कसून पाहणी केली आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली आहे.

आईची चौकशी होणार

तेजस्वीनीच्या खासगी आयुष्यापासून ते तिच्या आर्थिक व्यवहारापर्यंतच्या सर्व गोष्टींची चौकशी करूनच पुढील निष्कर्ष पोलीस काढणार आहेत. तसेच तेजस्विनीची आई अरुणाचीही चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us