Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवासात अपघात झाला तर किती मिळणार भरपाई ? नवीन नियम काय ?

जर तुम्ही कोणत्याही मेट्रो नेटवर्कचा वापर करत असाल, तर Metro Railways (Procedure of Claims) Rules, अंतर्गत तुमचे हक्क जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अपघात झाल्यास तुम्हाला वेळेवर आणि योग्य भरपाई मिळण्याची हे नियम खात्री देतात.

Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवासात अपघात झाला तर किती मिळणार भरपाई ? नवीन नियम काय ?
मेट्रो प्रवासात अपघात झाला तर किती मिळणार भरपाई ?
| Updated on: Jun 26, 2025 | 9:27 AM

Metro Accident Compensation Rules 2025 : आजकाल बहुतांश लोक मेट्रोने प्रवास करतात. जर तुम्हीही मेट्रोन प्रवास करत असाल आणि एखादा अपघाता झाला तर कायदेशीररित्या किती नुकसान भरपाई (compensation) मिळू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या मेट्रो नेटवर्कच्या वाढत्या विस्तारासह, ही माहिती प्रत्येक सामान्य नागरिकासाठी महत्त्वाची बनली आहे. विशेषतः सरकारने Metro Railways (Procedure of Claims) Rules, 2025 अंतर्गत भरपाई रकमेत सुधारणा केलेली असतानाच हे जाणून घेणं महत्वपूर्ण आहे. या बदलाद्वारे, भरपाईची रक्कम आता पूर्वीच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे. मेट्रो रेल्वेने प्रवास करताना गंभीर अपघातात जखमी झाल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला तर त्या लोकांना या नियमामुळे दिलासा मिळाला आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

Metro Railways (Procedure of Claims) Rules, 2025 काय आहेत ?

गंभीर अपघात किंवा त्याहूनही वाईट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने दावा कसा दाखल करावा हे या नियमांमध्ये स्पष्ट केले आहे. ते दावे आयुक्तांचे अधिकार, दावे दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि हे दावे निकाली काढण्यासाठीच्या वेळेची मर्यादा देखील निश्चित करतं. तसेच नुकसान भरपाईसाठी दावा कशाप्रकारे करावा हेही यात नमूद करण्यात आलं आहे.

त्यानुसार,

दावा आयुक्तांचे (क्लेम कमिश्नर) अधिकार निश्चित करण्यात आले आहेत.

कायद्यात त्याची वेळ मर्यादा आणि दावा किती काळाच्या आत निकाली काढायचा हे देखील निश्चित केले आहे.

दाव्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे देखील ते नमूद करण्यात आलं आहे.

संपूर्ण देशात हे नियम लागू होतात का ?

तर याचं उत्तर आहे हो. ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे, त्या सर्व शहरांत हे नियम लागू होतात. सध्याच्या काळात भारतातील 17 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क हे ॲक्टिव्ह आहे. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरु, नॉएडा, अहमदाबाद, पुणे, नागपुर, कोच्ची अशा शहरांचा समावेश आहे.

मृत्यू झाल्यास किती मिळते नुकसान भरपाई ?

जर एखाद्या प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त 8 लाख रुपये भरपाई मिळेल. यापूर्वी 2017 च्या नियमानुसार ही रक्कम 5 लाख रुपये होती, जी आता सुधारित करून वाढवण्यात आली आहे.

कोणाचे हात-पाय कापले कापले गेले तर भरपाई किती मिळेल ?

जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात अपघातात कापले गेले, किंवा एक हात आणि एक पाय किंवा दोन्ही पाय कापले गेले, तर अशा परिस्थितीत8 लाख रुपयांपर्यंत भरपाई दिली जाईल. पूर्वी ही रक्कम फक्त 4 लाख रुपये होती.

फ्रॅक्चर झाले तर ?

कायद्यातील बदलानुसार,

हिप जॉइंट फ्रॅक्चरझाल्यास 1.6 लाख रुपये मिळतील.

दोन्ही पायांच्या हाडांचे (फेमर, टिबिया) फ्रॅक्चर झाल्यास 1.6 लाख रुपये दिले जातील.

अर्धांगवायू नाही, पण पाठीचा कणा फ्रॅक्चर झाल्यास 2.4 लाख रुपये दिले जातील.

अर्धांगवायू झाल्यास 4 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.

पूर्वी ही सर्व रक्कम निम्मी होती, आता ती दुप्पट करण्यात आली आहे.

जर झालेली दुखापत, त्या यादीत नसेल तर भरपाई मिळेल का?

जर दुखापत कोणत्याही विहित यादीत येत नसेल, परंतु दावे आयुक्तांच्या मते ती व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करण्यास पूर्णपणे सक्षम नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये 4 लाख रुपये भरपाई दिली जाईल.