घरात खूप झुरळं झालेत आता चिंता सोडा, फक्त रात्रीच्या अंधारात स्प्रे करा ही खास घरगुती वस्तू, सकाळी दिसणारच नाहीत

घरात एकदा झुरळ झाले की तुम्ही कितीही काहीही करा ते लवकर नष्ट होत नाहीत, उलट त्यांची संख्या वाढतच जाते. मात्र तुम्ही फक्त एका ट्रिकने तुमच्या घरातील सर्व झुरळं नष्ट करू शकतात ते पुन्हा घरात कधीही येणार नाहीत.

घरात खूप झुरळं झालेत आता चिंता सोडा, फक्त रात्रीच्या अंधारात स्प्रे करा ही खास घरगुती वस्तू, सकाळी दिसणारच नाहीत
cockroach
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 7:44 PM

अनेकांना झुरळांची प्रचंड भीती वाटते, घरात एकदा झुरळं झाले की त्यांना पूर्णपणे नष्ट करणं हे अशक्य होऊन बसतं. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच जाते. त्यानंतर ते संपूर्ण घरात पसरतात, बेडरूम, बाथरूम, लिव्हिग रूम, स्वयंपाक घर जिकडं पहावं तिकडं झुरळचं झुरळं दिसतात. या झुरळांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. ज्या घरात झुरळांची संख्या जास्त आहे, त्या घरातील लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे तुलनेनं इतरांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे अनेक जणांना घरात झालेले झुरळं नष्ट कसे करायचे? याची चिंता असते. अनेकजण त्यासाठी बाजारात मिळणारे विविध रासायिक पदार्थ, स्प्रे, पावडर आणतात. मात्र यामुळे झुरळं तर नष्ट होतच नाहीत, मात्र अशा रासायिक पदार्थांमुळे एखाद्यावेळी तुम्हाला देखील धोका होऊ शकतो. जर तुमच्या घरात लहान मुल असेल तर अशा प्रकारच्या वस्तू घरात ठेवणं हे धोक्याचं असतं. मात्र आता काळजी करू नका तुम्ही अगदी नौसर्गिक पद्धतीने झुरळाचा खात्मा करू शकता, त्यानंतर तुम्हाला घरात पुन्हा एक देखील झुरळ दिसणार नाही.

तुम्हाला त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने एक स्प्रे बनवायचा आहे, त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या तुमच्या घरातच मिळतात. सगळ्यात आधी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये एक मोठा चमचा लवंगा आणि दोन तेज पत्त्याची पान टाकून त्याला उकळून घ्या, पाण्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा ज्याला आपण खाता सोडा असं देखील म्हणतो तो टाका. त्यानंतर त्या पाण्याला थंड होऊ द्या, त्यानंतर हे पाणी गाळणीमधून गाळून घ्या आणि त्याचा एक स्प्रे तयार करा.

हा स्प्रे कसा वापरायचा?

हा स्प्रे अशा सर्व ठिकाणी मारायचा ज्या -ज्या ठिकाणी झुरळांची लपण्याची जागा आहे. स्वयंपाक घर, बेडरूम, बाथरूम, किचन ट्रॉली अशा सर्व ठिकाणी तुम्ही हा स्प्रे मारू शकता. रात्रीच्या वेळी हा स्प्रे मारायचा सकाळी तुम्हाला तुमच्या घरात एकही झुरळ दिसणार नाही. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असणार? हा स्प्रे नेमका काम कसं करतो त्यामध्ये तर कोणताही रासायनिक घटक नाहीये, किंवा विषारी द्रव्य देखील नाहीये तर त्याचं उत्तर असं आहे की, झुरळं किंवा इतर किटकांना मसाल्याचा तीव्र वास हा सहन होत नाही, ते घरातून दूर निघून जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us