
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी घुसतं, त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात आणि निवाऱ्यासाठी सुरक्षित जााग शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा साप तुमच्या घरात असलेला अडागळीची जागा त्यासाठी शोधतात, तुम्हाला अनेकदा असं आढळून आलं असेल घरामध्ये जिथे-जिथे अडचण असते तिथे अनेकदा साप आढळून येतात.
पावसाच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. पावसांच पाणी बिळात शिरल्यामुळे साप हे बिळातून बाहेर पडतात. पावसाळ्यात शेतीची देखील कामं सुरू असतात अशा परिस्थितीमध्ये अनेकदा सापांकडे दुर्लक्ष होतं आणि आपल्याला धोका आहे असं समजून साप तुमच्यावर हल्ला करू शकतो. सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी पन्नास हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा सर्पदंशामुळे होतो.
मात्र इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेतली पाहिजे की, भारतात सापांच्या जेवढ्या प्रजातील आढळतात त्यातील प्रत्येक जात ही विषारीच असते असं नाही. मात्र प्रत्येक साप हा विषारीच असतो हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण अनेकदा दिसला साप की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. यामुळे देशातील सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत.
भारतामध्ये सापांच्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जाती या विषारी आहेत. ज्यामध्ये नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो, फुरसे, मण्यार आणि घोणस या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. याला बीग फोर असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला पकडण्याच किंवा मारण्याचा प्रयत्न न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, सापांना पकडणं तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. अशा काही वनस्पती आहेत, त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून सापांपासून बचाव करू शकता, अशाच एका वनस्पतीबद्द आज आपण माहिती घेणार आहोत.
सर्पगंधा – सर्पगंधा ही अशी वनस्पती आहे, ज्यामुळे साप तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही. या वनस्पतीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, तसेच तिला तीव्र असा वास असतो, ज्यामुळे साप या वनस्पतीच्या आसपास देखील फिरकत नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)