जर इलेक्ट्रिक मीटरमध्ये दिसली ही गोष्ट तर तुम्हाला 100 टक्के बिल खूप जास्त येणार, माजी वीज कर्मचाऱ्याने सांगितली सोपी ट्रीक

तुमच्या मीटरमध्ये अशी एक वस्तू असते, ज्यामुळे जर तुम्हाला वीजबिल जास्त येणार असेल तर ते आधीच कळतं, मात्र याबाबत अनेकांना माहितीच नसतं, याबाबत एका माजी वीज कर्मचाऱ्याने माहिती दिली आहे.

जर इलेक्ट्रिक मीटरमध्ये दिसली ही गोष्ट तर तुम्हाला 100 टक्के बिल खूप जास्त येणार, माजी वीज कर्मचाऱ्याने सांगितली सोपी ट्रीक
electric meter
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 1:01 PM

इलेक्ट्रिक मीटर केवळ तुमच्या वीज युनिटचं मोजमापच करत नाही तर या विद्युत मीटरमध्ये अशा देखील काही गोष्टी असतात, ज्या तुमच्या मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला किंवा तुम्हाला वीजबिल जास्त येणार असेल तर आधीच संकेत देतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की नेमक्या अशा कोणत्या गोष्टी असतात? ज्या तुमचं मीटर फॉल्टी असेल किंवा तुम्हाला वीजबिल जास्त येणार असेल तर आधीच संकेत देतात? तुमच्या इलेक्ट्रिक मीटरला एक लाल पल्स लाईट असते, कधीकधी ही एलइडी लाईट सर्वसामान्य वेगापेक्षा अधिक तीव्र गतीने ब्लिंक करते, याचा अर्थ असा होतो की एकतर तुम्ही विजेचा खूप जास्त वापर करत आहात किंवा तुमच्या घराच्या लायटिंगमध्ये काही तरी फॉल्ट आहे, किंवा कुठेतरी लिकेज आहे. कराण तुमच्या घराच्या मीटरला असणारी ही लाल लाईट जेवढ्या जास्त वेळा ब्लिंक करेल तेवढं जास्त वीजबिल तुम्हाला महिन्याच्या शेवटी येणार आहे, असा याचा अर्थ होतो.

तुमच्या घरात काही अशी उपकरणं असतात, ज्याला जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज असते, जेव्हा तुम्ही एकाचवेळी अशी सर्व उपकरणे सुरू करता, तेव्हा तुम्ही एकदा तुमच्या मीटरच निरीक्ष करा, तुमच्या मीटरला असलेला हा छोटासा लाईट खूप जास्त वेगाने ब्लिंक करेल याचा अर्थ तुमचा वीजेचा वापर वाढला आहे. त्यानंतर आता तुम्ही तुमच्या घरातील सर्व वीजेवर चालणारी उपकरणं बंद करा आणि पुन्हा एकदा या मीटरचं निरीक्षण करा, तेव्हा हा लाईट अतिशय संथ गतीने ब्लिंक करेल. जर समजा तुमच्या मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला जास्त वीजबिल येत असेल तर तुम्ही कोणतंही उपकरण न वापरता देखील हा लाईट खूप जास्त वेळा ब्लिंक करतो.

त्यामुळे जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या मीटरचा लाल एलईडी लाईट हा खूप जास्त वेगाने ब्लिंक करतो आहे, तर अशावेळी तुम्ही आधी याची खात्री करा की तुमच्या घरात खूप जास्त वीजेची गरज असणारं एखादं उपकरण तर चालू नाहीये ना? जर असं एखादं उपकरण चालू नसेल आणि तरी देखील तुमच्या मीटरचा लाईट खूप जास्त वेळा ब्लिक करत असेल तर याचा अर्थ तुमच्या मीटरमध्ये काही तरी बिघाड झाला आहे, असा होतो, अशावेळी तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिशयनशी किंवा विद्युत पुरवठा विभागाशी संपर्क साधणं गरजेचं असतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us