सरकारचा मोठा निर्णय, …तर टोल पार करताच भरावे लागणार 10000 रुपये, वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या

वाहनचालकांची सुरक्षा आणि वाढलेल्या रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षात घेऊन आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे आता वाहनधारकांना तब्बल दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

सरकारचा मोठा निर्णय, ...तर टोल पार करताच भरावे लागणार 10000 रुपये, वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या
toll plaza
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 8:36 PM

जर तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढलेला नसेल किंवा त्याची मुदत संपलेली असेल तर आता टोल प्लाजा पार करताना तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. जर तुमच्या वाहनाचा वैध विमा नसेल तर टोल प्लाजा पार करताच तुम्हाला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कडून आता तशी नवी व्यवस्थाच करण्यात आली आहे. तुम्ही टोल नाका पार करताच तुमच्या वाहनाचा विमा आहे की नाही, याबाबत माहिती मिळणार आहे. जर तुमच्या वाहनाचा विमा नसेल तर थेट तुमच्या मोबाईलवर यासंदर्भात एक मेसेज येणार आहे. नागरिकांनी वाहनाच्या विमा नियमांचं व्यवस्थित पालन करावं, आणि वाहतूक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र NHAI च्या या निर्णयाचा मोठा फटका हा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. नव्या यंत्रणेमुळे तुमचं वाहन टोल पास करताच तुमच्या वाहनाचा विमा आहे की नाही, त्याची मुदत संपली आहे का? या सर्व गोष्टी लगेच कळणार आहेत. जर तुमच्या वाहनाचा विमा नसेल किंवा तो संपला असेल तर तुम्हाला थेट दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे आता प्रत्येक वाहनधारकांना आपल्या वाहनाचा विमा हा करावाच लागणार आहे.

Loading...

ही यंत्रणा कशी काम करते?

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून ही नवी सिस्टम अंमलात आणण्यात आली आहे. प्रत्येक टोल नाक्यावर NHAI कडून ही स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तुमच्या वाहनाने टोल नाका पार केल्यानंतर पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच तुमच्या वाहनाचा विमा आहे की नाही? याची माहिती संबंधित विभागाला कळणार आहे. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस अलर्ट पाठवला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुमच्या वाहाचा विमा रिन्यू करून घ्या, असा सल्ला असणार आहे. तसेच तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर वाहन कायद्यानुसार तुम्हाला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो, असा इशारा देखील देण्यात येणार आहे.

मोटर वाहन कायद्यानुसार तुम्ही जर अशा पद्धतीने विमा नसताना वाहन चालवताना आढळून आल्यास पहिल्यावेळी तुम्हाला दोन हजारांचा दंड होतो. परंतु हीच चूक तुम्ही पुन्हा केली तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच इतरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us