AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Verma : ‘रामायण’ मालिकेत साकारली महत्वपूर्ण भूमिका, नंतर काम मिळणं झालं कठीण; मुंबईला केला रामराम अन्…आता जगतोय असं आयुष्य

रामायण मालिकेत जटायूची भूमिका साकारणारे सुनील वर्मा आज इंडस्ट्रीपासून लांब आहेत. त्यांनी रामायणाव्यतिरिक्त इतरही अनेक भूमिका साकारल्या, पण आता ते पाटणा येथे आपल्या कुटुंबासोबत साधं जीवन जगतात.

Sunil Verma : 'रामायण' मालिकेत साकारली महत्वपूर्ण भूमिका, नंतर काम मिळणं झालं कठीण; मुंबईला केला रामराम अन्...आता जगतोय असं आयुष्य
| Updated on: Nov 18, 2026 | 8:25 PM
Share

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, रावण यांच्यासोबतच जटायूची भूमिकाही विशेष लक्षात राहिली. जटायूची भूमिका अभिनेता सुनील वर्मा यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी विशेष वेशभूषा आणि मेकअप केला होता. त्यांच्या अभिनयाचं त्यावेळी खूप कौतुक झालं. मात्र, एवढी महत्त्वाची भूमिका साकारूनही सुनील वर्मा पुढे मनोरंजनविश्वापासून दूर गेले. सध्या ते काय करतात आणि कुठे राहतात, याबद्दल जाणून घेऊया.

1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सुनील वर्मा यांनी जटायूची भूमिका साकारली होती. त्यांनी या मालिकेत केवळ जटायूच नव्हे, तर इंद्रदेव, गरुड, रावणाचा मुलगा, च्यवन ऋषी आणि सुतीक्ष्ण मुनी अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखाही साकारल्या होत्या. जटायूच्या भूमिकेसाठी सुनील यांना विशेष पोशाख आणि मुखवटा घालावा लागायचा. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा चेहरा दिसायचा नाही. मात्र, त्यांच्या अभिनयामुळे जटायूची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली.

‘रामायण’ मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर सुनील वर्मा यांनी ‘उत्तर रामायण’ आणि ‘टीपू सुल्तान’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. याशिवाय ‘हथियार’, ‘फतेह’, ‘रंग’ आणि ‘सरजमीं’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ते दिसले. मात्र, एक काळ असा आला की, त्यांना अभिनयक्षेत्रात फारसं काम मिळेनासं झालं. त्यामुळे त्यांनी मुंबई सोडून बिहारची वाट धरली आणि तिथेच स्थायिक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सध्या बिहारमधील पाटणा येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. अभिनयाची कामं कमी झाल्यानंतर त्यांनी छोट्या-मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच ते स्वतःचा व्यवसायही सांभाळतात. मनोरंजनविश्वाच्या झगमगाटापासून दूर राहून ते साधं आयुष्य जगत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय

सुनील वर्मा मनोरंजनविश्वापासून दूर असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विविध ट्रेंडिंग विषयांवर रील्स बनवून ते शेअर करतात. तसेच कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करत असतात.

सुनील वर्मा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. याच काळात पृथ्वी थिएटरमध्ये त्यांची भेट अभिनेता विजय काविश यांच्याशी झाली. विजय काविश यांनी ‘रामायण’मध्ये भगवान शिव यांची भूमिका साकारली होती. त्यांच्याच ओळखीतून सुनील यांची रामानंद सागर यांच्याशी भेट झाली. सुरुवातीला त्यांना इंद्रदेवाची भूमिका देण्यात आली. त्यानंतर मालिकेतील इतर व्यक्तिरेखांसाठीही त्यांची निवड झाली. मात्र, जटायूच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण