AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सून संपला तरी 23 राज्यांना पावसाचा इशारा; ताशी 75 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्राचं काय?

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पण आता परतीचा पाऊस परत आगमन करणार आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी तणावपूर्ण ठरु शकतो.

मान्सून संपला तरी 23 राज्यांना पावसाचा इशारा; ताशी 75 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्राचं काय?
Maharashtra Rain News Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 4:41 PM
Share

मान्सून संपल्यानंतरही देशातील २३ राज्यांमध्ये १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, उद्या म्हणजे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी देशात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळू शकतो. उद्या तब्बल २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. ज्यामध्ये यूपी, बिहार हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड ओडिशा, पश्चिम बंगाल छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, आसाम, त्रिपूरा, नागालँड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे शेतीपिकांचं नुकसान होण्याची शक्यत निर्माण झाली आहे.

मान्सून संपला आहे. पण आता हवामान खात्याने आणखी एक मोठा आणि चिंताजनक इशारा दिला आहे. ताज्या अंदाजानुसार उद्या १८ ऑक्टोबर रोजी देशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशातल्या २३ राज्यांमध्ये हा इशारा जारी करण्यात आल्यामुळे देशातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर सुरक्षित ठिकाणी निवारा घेण्याचे आवाहनही केले जात आहे.

या मुसळधार पावसामुळे एकूण तापमानात २ते३ अंशांची घटही होऊ शकते. बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्यामुळे अनेक राज्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्रातील उद्याचे तापमान कमी असू शकते. मुंबईमध्ये कमाल तापमान ३४ अंश ते २७ अंश सेल्सियसपर्यंत राहू शकते. त्यामुळे संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमिवर सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला