
प्रत्येक देशाचं एक स्वतंत्र चलन असंत, प्रत्येक देशाच्या चलनाला आंतरराष्ट्रीय बाजारात एक विशिष्ट किंमत असते, जगातील प्रत्येक देशाच्या चलनाची किंमत ही वेगवेगळी आहे. भारताला देखील आपलं एक चलन आहे, ज्याला आपण रुपया असं म्हणतो. जगात असे काही देश आहेत, ज्यांचं चलन हे खूप मजबूत आणि सशक्त आहे. जसं की डॉलर, डॉलरचं मूल्य हे रुपयापेक्षा खूप जास्त आहे. एक डॉलर म्हणजे जवळपास 75 रुपये होतात. त्यामुळे जेव्हा आपण अशा देशांमध्ये फिरण्यासाठी जातो, जिथे चलन म्हणून डॉलरचा वापर केला जातो, तिथे सहाजिकच आपल्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते.
मात्र जगाच्या पाठीवर असे देखील काही देश आहेत, ज्या देशाच्या चलनाचं मूल्य हे भारतीय रुपयापेक्षा खूपच कमी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यांचं देता येईल, तुम्ही नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलात तर तिकडे तुमच्या एका रुपयाचं मूल्य हे सात ते आठ रुपये असतं, त्यामुळे तुम्ही असे देश आरामात फिरून शकता, इथे तुम्हाला फार खर्च येत नाही. हे देश पर्यटनासाठी तुलनेनं कमी खर्चिक असतात.
तुम्हाला माहिती आहे का? जगात असा देखील एक देश आहे, जिथे भारताच्या 100 रुपयांची किंमत चक्क 50 हजार रुपये होते? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की इराणची करंन्सी भारतीय करंन्सीच्या तुलनेत खूपच कमजोर आहे. इथे भारताच्या 100 रुपयांची किंमत 50 हजार इराणी रियाल एवढी होते.
इराणच्या चलनाचं नाव इराणी रियाल आहे, इराणचं हे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत खूप कमजोर आहे. इथे भारताच्या 100 रुपयांचे 50 हजार रियाल होतात, यावरूनच तुम्हाला इराणच्या रियालच्या मुल्याचा अंदाज येईल. जर तुमच्याकडे शंभर भारतीय रुपये असतील तर तुम्ही इराणमध्ये 10 दिवस आरामात राहू शकता, तेवढ्या रुपयांमध्ये तुम्ही हा देश आरामात फिरू शकता, पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. मात्र दुसरीकडे इस्रायलच्या चलनाची किंमत भारतीय रुपयांपेक्षा जास्त आहे. भारताचे दहा रुपये इस्रायलमध्ये केवळ 4.40 एवढेच होतात.