AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराला कोणाची नजर लागलीये असं वाटतंय का? मग गुरुवारी करा हा सर्वात सोपा उपाय

आपण खूप कष्ट करतो, पण अनेकदा आपल्या हातात पैसा टिकत नाही. मनामध्ये कायम अस्वस्थता असते. काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. हे घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषामुळे होऊ शकतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका सोप्या उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घराला कोणाची नजर लागलीये असं वाटतंय का? मग गुरुवारी करा हा सर्वात सोपा उपाय
vastu Shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 9:16 PM
Share

अनेकदा काही गोष्टी या तुमच्या मनाविरोधात घडत असतात. तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करतात परंतु त्या कष्टाचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. त्यावेळी तुम्ही नकळत असं देखील म्हणून जातात की माझ्या घराला कोणाची नजर लागली काय माहिती? नजर लागणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याबद्दल माहिती जाणून घेऊयात. नजर लागणं म्हणजे काय तर आपण अनेकदा आपल्या घरी बऱ्याच लोकांना बोलावत असतो. त्यातील काही लोक हे चांगल्या स्वभावाची असतात, आपली प्रगती बघून मनापासून आनंदी होतात. मात्र सर्वच लोकं असे असतील असं नाही. त्यातील काही लोक आपली प्रगती बघून वरवर आनंद झाल्याचं दाखवतात मात्र मनातून आपलं वाईट चिंतित असतात. जेव्हा हे लोक आपल्या बद्दल वाईट चिंतितात तेव्हा घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्यालाच आपण घराला नजर लागली असं म्हणतो.

काय आहेत परिणाम

जर आपल्या घराला एखाद्याची नजर लागली तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. यालाच आपण वास्तुदोष असं देखील म्हणतो. जेव्हा आपल्या घराला एखाद्याची नजर लागते तेव्हा काहीही कारण नसताना घरात भांडणाला सुरुवात होते. घर कायम अंशात राहतं. एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते. त्यामुळे नेहमी अशा गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. तसेच घरात ऊर्जा संतुलन कसं राहील या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. आज आपण यावरील उपायाबद्दल जाणून घेऊयात.

उपाय

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची नजर लागली आहे, तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सोपा उपाय सांगण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार दर गुरुवारी सांयकाळच्यावेळी थोडसं गोमूत्र घ्या, त्यामध्ये हाळद मिक्स करा आणि त्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा एकदा पुसून काढा. यामुळे घरात आलेलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच जर कोणाचीही नजर जर घराला लागली असेल तर त्यातून देखील आपली रक्षा होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....