AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले

अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आईच्या पाठीवर खेळणाऱ्या चार वर्षांच्या लेकी एका बिबट्याने पकडून त्याने शेतात झेप घेतली. मात्र, आई-लेकीचा किंचाळण्याचा आवाज आला आणि बापाने बिबट्यावर झेप घेतली...

काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले
father saved Daughter from leopard
| Updated on: Jun 21, 2026 | 7:38 PM
Share

एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे बापलेक विहिरीत पडले. त्यामुळे हे बापलेक जखमी झाले आहे. हा बिबट्या यावेळी झालेल्या आरडाओरडीने पळाला आहे. मात्र या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता तिच्या आई – वडीलांनी केली आहे.

अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केले. मात्र मुलीची सुटका केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना बाप-लेक दोघेही अंधारात खोल विहिरीत कोसळले. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव

शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील मनोज गुंजाळ यांच्या अवघ्या चार वर्षीय मुलगी अवनी हिच्यावर घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. आईच्या पाठीवर असलेल्या अवनी हिला बिबट्याने तोंडात पकडून ओढत नेण्यास सुरुवात केली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली…मात्र त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे ते विहीरीत कोसळल्याने जखमी झाले आहेत.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण