Indian Oil Crisis : अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अ‍ॅक्टिव्ह….तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय!

इराण-इस्रायल युद्धामुळे जगात तेलसंकट निर्माण झाले आहे. भारतालाही त्याचा फटका बसतो आहे. दरम्यान तेलटंचाई भासू नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आपला प्लॅन बी अॅक्टिव्ह केला आहे.

Indian Oil Crisis : अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अ‍ॅक्टिव्ह....तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय!
indian oil crisis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 3:17 PM

India Oil Crysis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता चांगलेच भीषण रुप झाले आहे. गेल्या 22 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग उर्जा संकटाच्या खाईत लोटलं गेलंय. पाकिस्तानात महागाई वाढली आहे. या युद्धाचा फटका पश्चिम आशियातील अनेक देशांना बसत आहे. दुसरीकडे भारतातही इंधन तुटवडा निर्माण होतोय. गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. अशीच स्थिती भविष्यातही कायम राहिली तर भारतात पेट्रोल, डिझेलचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आता भारताने आपला प्लॅन बी अॅक्टिव्ह केला आहे. काहीही झालं तरी भारतात इंधन टंचाई भासणार नाही, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.

भारत सरकार नेमकी काय खबरदार घेत आहे?

इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेले उर्जासंकट परतवून लावण्यासाठी भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. भारताने इतर उपायोजनांचा अवलंब करणे सुरू केले आहे. भारताने पर्यायी आयात व्यवस्था सक्रीय केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल मागवत आहे. अॅक्वा टायटन नावाचे रशियन जहाज तब्बल 7.7 लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारतात येत आहे. या कच्च्या तेलामुळे भारतात उर्जा संकट बऱ्यापैकी कमी होणार आहे. दुसरीकडे 18 मार्च रोजीच जग लाडकी नावाचे तेल घेऊन येणारे जहाज मुंद्रा पोर्टवर आलेले आहे. गेल्या 22 दिवसांत भारताने तेलाचे चार मोठे जहाज आणले आहेत. या जहाजांत नैसर्गिक वायू आणि तेल आहे.

भारताकडे पुरेसा तेलसाठा

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली असली तरी भारत आता अन्य वेगवेगळ्या मार्गांनी कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायुंचा पुरवठा करत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी भविष्यात इंधन तुटवडा होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारताला प्रतिदिन 55 लाख बॅरल तेल लागते. भारताकडे तेलाचा पुरेसा साठा आहे, असे केंद्राने सांगितले.

Follow Us