भर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्ज प्रचंड भडकल्या, सोनिया गांधी बघतच राहिल्या; थेट राजीनाम्याची मागणी!

पश्चिम बंगालसह हरियाणा, बिहार आणि मध्यप्रदेशातही निवडणूक आयोगाने घोळ केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी भाजपला निवडणुका जिंकवल्या असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, असं म्हटलं आहे.

भर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्ज प्रचंड भडकल्या, सोनिया गांधी बघतच राहिल्या; थेट राजीनाम्याची मागणी!
India alliance press conferance delhi mamta banergee slams bjp and election commisonar dnyanesh kumar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 3:29 PM

इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरु आहे. यामध्ये ममत बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. वोट चोरी करुन भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. ज्ञानेश कुमार चोर आहेत, हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, असं ममता दीदींनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी ममता बॅनर्जी चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत. आता जो मोठा स्कॅम झाला आहे, त्याबद्दल बोलूयात. हे खूप भयंकर प्रकरण आहे. याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. जो वोटचोरीचा प्रकार बिहारमध्ये झाला, त्याचा फटका राहुल आणि तेजस्वी यांना बसला. याच वोटचोरीच्या जीवावर भाजप जिंकला. मध्यप्रदेशमध्येही तेच करुन जिंकलाय. हरियाणातही तेच केलं. बंगालमध्येही वोट्सची चोरी केली. मी त्यावरुन इथे दिल्लीत आले होते. लोकांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. मी सुप्रीम कोर्टातही गेले होते. मी सगळे दरवाजे ठोकले. पण आता उघड उघड झाले आहे, की ज्ञानेश कुमार हे चोर आहेत. डाकू आहेत. त्यांनी वोट चोरी केली आहे. इव्हिएम मशीन्स जाळले. मशीन्स हॅक केल्या. मतमोजणीत घोळ केला. त्यांनी सर्वकाही केलं, जेणेकरुन त्याचा भाजपला फायदा होईल, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे.

Loading...

आता लोकशाही वाचवायची, इथल्या लोकांना वाचवायची वेळ आली आहे. त्यांचा मतदानाचा हक्क वाचवायचा आहे. जर त्यांनी दिलेलं मत वळवलं जात असेल तर त्याचा परिणाम भोगावा लागणार. देश विध्वंसाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे जर ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा जर असं नाही झालं तर आम्ही प्रचंड मोठं आंदोलन उभा करु, असा इशारा ममता दींदींनी दिला.

इंडिया आघाडीने या पत्रकार परिषदेमध्ये २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळ्यांवर मोर्चा काढणार असल्याचीही घोषणा केली आहे. या आंदोलनाची घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us