इंडिया आघाडीची मोठी घोषणा! निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढणार, आता देशभरात आंदोलनांचं वादळ!

इंडिया आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली आपल्या या पत्रकार परिषदेने सर्वात मोठी घोषणा केली. इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी हा मोर्चा असेल. india alliance to organize big protest across india from 1 october to 8 october

इंडिया आघाडीची मोठी घोषणा! निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढणार, आता देशभरात आंदोलनांचं वादळ!
india alliance
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 3:10 PM

India Alliance Protest Against Gyanesh Kumar : भारतीय निवडणूक आयोगाच मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या सोबतच्या दोन निवडणूक आयुक्तांना डावलून त्यांनी काही निर्णय घेतले आहेत, असा दावा केला जातोय. तशा तक्रारीही दोन आयुक्तांनी केल्याचे समोर आलेय. त्यानंतर आता विरोधक चांगलेच संतापले आहेत. एसआयआर, काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका याबाबतचे निर्णय हे सकारधार्जीने कसे असतील यासाठी प्रयत्न करण्यात आला, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सोबतच ज्ञानेश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा, अशी मोठी मागणी केली जातेय. दरम्यान, आता इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही देशभरात आंदोलन करणार, असे इंडिया आघाडीने जाहीर केले. सोबतच जिल्हा पातळीवरही हे मोर्चे काढले जातील, असे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीने नेमकी काय घोषणा केली?

इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी इंडिया आघाडीच्या मोर्चाविषयीच्या नियोजनाबाबत माहिती दिली. येत्या 6 ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीचे खासदार भारतीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. 2 ते 8 ऑक्टोबर या काळात देशभरात राज्य पातळीवर मोर्चे काढले जातील. सोबतच या काळात देशात एकूण पाच ठिकाणी सर्वात मोठी रॅली काढली जाणार आहे.

Loading...

ममता बॅनर्जी संतापल्या

दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीदेखील या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ज्ञानेश कुमार यांनी आपला राजीनामा न दिल्यास आम्ही हे आंदोलन मोठे करू.  ज्ञानेश कुमार हे चोर आहेत, असा संताप बॅनर्जी यांनी व्यक्त केला. हे मत व्यक्त करताना ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या होत्या. दरम्यान, आता इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार नेमकी काय भूमिका घेणार? ते आपल्या पदाचा राजीनामा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us